Homeउद्योगशेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार.. सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ,सांगली तासगावात पोहोचला चीनचा बेदाणा, चीनचा बेदाणा...

शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार.. सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ,सांगली तासगावात पोहोचला चीनचा बेदाणा, चीनचा बेदाणा अफगानिस्तान मार्गे भारतात

सांगली / विशेष प्रतिनिधी
बेदाणा दर पाडण्याच्या हेतूने सांगली आणि तासगावमधील काही व्यापाऱ्यांनी जाणीवपूर्वक अफगाणिस्तानचा म्हणून चीनचा बेदाणा सौद्यात आणला आहे, असा आरोप द्राक्ष संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरात प्रति किलो ४० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. याचा फटका बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गतवर्षीच्या हंगामातील जवळपास दीड हजार ते दोन हजार गाडी म्हणजे पंधरा हजार ते वीस हजार टन बेदाणा शिल्लक आहे. हा बेदाणा नवीन बेदाणा येईपर्यंत म्हणजे जवळपास दोन महिने पुरवठा होईल इतका आहे.वास्तविक पाहता गत हंगामात बेदाण्याचे उत्पादन घटल्याने चांगले दर मिळत आहे. गेल्या महिन्यापासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. अशा स्थितीमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अफगाणिस्तानचा बेदाणा येणार असल्याची चर्चा सुरू होती. किती बेदाणा येणार या बाबत स्पष्टता नव्हती.

अफगाणिस्तानच्या नावाखाली चीनचा बेदाणा
गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानच्या नावाखाली चीनचा बेदाणा देशभरातील बाजारपेठेत आला आहे. सांगली, तासगाव या दोन ठिकाणी पाच हजार टन बेदाण्याची आवक झाली असल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत. वास्तविक पाहता चांगल्या बेदाण्याला २५० ते ४१० रुपये प्रति किलो असे दर मिळत आहे. यंदाही अतिपावसाचा फटका द्राक्ष पिकाला बसला आहे. त्यामुळे उत्पादन घटल्याने त्याचा थेट परिणाम बेदाणा निर्मितीवर होणार असून हंगाम लांबणीवर जाणार आहे. या साऱ्या गोष्टी लक्षात घेत दर कमी करण्याचा घाट या व्यापाऱ्यांनी घातला आहे, असा आरोप बेदाणा उत्पादक शेतकरी करू लागला आहे.

आयात कायदेशीर की बेकायदेशीर
बेदाणा चीनचा आहे. हा बेदाणा दुबई मार्गे अफगाणिस्तानमध्ये आला आणि इथल्या निर्यातदारामार्फत अमृतसर मध्ये आला. चीनचा बेदाणा अफगाणिस्तानच्या नावाने बॅण्डिंग करून तो भारतात आणला आहे. मुळात बेदाणा कायदेशीर आणला की बेकायदेशीर हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रात बेदाण्याचे उत्पादन होत असताना बाहेरचा बेदाणा व्यापाऱ्यांनी का आणला आहे. हा निष्कृष्ट बेदाणा आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी द्राक्ष संघाने केली आहे.

बेदाण्याचे दर पाडण्यासाठी चीनचा बेदाणा मागविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई व्हावी
चीनमध्ये गत महिन्यापासून बेदाण्याचा हंगाम सुरू झाला आहे. हा बेदाणा अफगाणिस्तानच्या नावाखाली भारतात आणला आहे. मात्र हा बेदाणा कोणत्या निकषानुसार आणला जातो. बेदाण्याचे दर पाडण्यासाठी सांगली आणि तासगावच्या व्यापाऱ्यांनी हा बेदाणा विकत घेतला आहे. त्या व्यापाऱ्यांवर कारवाई व्हावी. शीतगृहात येणाऱ्या बेदाण्यावर बाजार समितीचे नियंत्रण हवे. शासनाने बेदाणा शीतगृहांचे जिओ टॅगिंग करावे. शीतगृहांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजेत. येणाऱ्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर चीनचा बेदाणा तस्करी मार्गाने आणून दर पाडण्याचा घाट घालणाऱ्या व्यापाऱ्यांवर आळा घातला पाहिजे.
मारुती चव्हाण, उपाध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या व उद्योगाला बदनाम करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी राहू नये
महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकरी बेदाण्याचे उत्पादन करतात. निर्यात वाढीसाठी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया. जे चुकीचे काम करून उद्योगाला बदनाम करीत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहू नये.
सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!