Homeउद्योगजरा धीर धरा.. आपल्या माथ्यावरचा दुष्काळग्रस्त कलंक मिटणार म्हणजे मिटणार - आ....

जरा धीर धरा.. आपल्या माथ्यावरचा दुष्काळग्रस्त कलंक मिटणार म्हणजे मिटणार – आ. समाधान आवताडे

जरा धीर धरा.. आपल्या माथ्यावरचा दुष्काळग्रस्त कलंक मिटणार म्हणजे मिटणार – आ. समाधान आवताडे
* नंदेश्वर येथील गुरुमाऊली पतसंस्थेचे उद्घाटन संपन्न

नंदेश्वर /प्रतिनिधी
विधानसभेत पाय ठेवल्यानंतर पहिल्यांदा मी भाषण केले होते की आम्ही मंगळवेढेकर दुष्काळग्रस्त हा शिक्का माथ्यावर घेऊन जरी जन्माला आलो असलो तरी दुष्काळग्रस्त म्हणून मरणार नाही. त्यासाठी अखंडपणे सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. थोडा धीर धार आपल्या माथ्यावरचा दुष्काळग्रस्त हा कलंक मिटणार आहे. मंगळवेढा उपसा सिंचन ही २४ गावांची योजना पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे. असे प्रतिपादन आ. समाधान आवताडे यांनी केले. नंदेश्वर ता. मंगळवेढा येथील गुरुमाऊली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील तनिष आयकॉन गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन रुक्मिणी दोलतडे होत्या. यावेळी देवसागर साधक ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर लाड, दामाजीचे संचालक औदुंबर वाडदेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे, शिवसेना शहरप्रमुख प्रतिक किल्लेदार, माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे, उपसरपंच आनंदा पाटील, गुरुमाऊली दूध संस्थेचे चेअरमन बाबासाहेब मोटे, राहुल मोटे हे उपस्थित होते.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;

यावेळी बोलताना आमदार आवताडे म्हणाले की, शहरांमध्ये अगदी मोजक्या प्रमाणात दिसणाऱ्या पतसंस्था आज गावोगावी रोज नव्याने स्थापन होताना दिसत आहेत. शेतकरी, व्यवसायिक, उद्योजक यांच्याबरोबर सर्वच क्षेत्रातील लोकांना पतसंस्था या सध्या चांगल्या पद्धतीने पतपुरवठा करून सर्वांच्याच विकासात भर टाकताना दिसत आहेत. पण पतसंस्था यशस्वीपणे चालण्यासाठी वेळेत कर्ज फेडणारा कर्जदार मिळणे आवश्यक आहे. नंदेश्वर येथील बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा स्थलांतरित होत असताना मी अगदी जिल्हाधिकाऱ्यांपासून ते जिथे जिथे योग्य पाठपुरावा करायचा आहे तिथे केला आणि बँक तूर्तास तरी स्थलांतरित होण्यापासूनच थांबली आहे. पण बँक स्थलांतरित होण्यापाठीमागची कारणे शोधून त्यावरती उपाय होणे गरजेचे आहे.
यावेळी कोंडीराम पतसंस्थेचे चेअरमन बंडू करे, माजी उपसरपंच राहुल कसबे, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक समितीचे माजी सदस्य आकाश डांगे, जयसिंग कांबळे, दत्ता साबणे, पोपट बंडगर, सुभाष खांडेकर, दिगंबर गरंडे, बाबुराव चौंडे हे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औदुंबर कुंभार यांनी केले तसेच प्रास्ताविक श्री माऊली पतसंस्थेचे चेअरमन आण्णासाहेब बंडगर यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन माजी ग्रा.पं. सदस्य गुरुलिंग दोलतडे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा भूषण पुरस्काराने संपादक दिगंबर भगरे सन्मानित, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे दिगंबर भगरे यांचेवर सर्व...

मंगळवेढा / बाबासाहेब सासणे श्री दामाजी संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘मंगळवेढा भूषण’ पुरस्कार दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे यांना प्रदान करून त्यांच्या...

अनाथ व गरीब कुटुंबातील मुलांना शालेय शिक्षणासोबतच वारकरी संस्कारांचे मोफत शिक्षण देण्याचा उपक्रम, नंदेश्वर...

नंदेश्वर / प्रतिनिधी : समाजातील अनाथ, निराधार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार घडविण्याच्या उद्देशाने नंदेश्वर येथे...

कौतुकास्पद…प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने मसनेरवस्ती शाळेत स्पोर्ट्स किटचे वाटप, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून...

नंदेश्वर / प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसनेरवस्ती येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. प्रेरणा स्पोर्ट गारमेंटचे...

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

error: Content is protected !!