नंदेश्वर /प्रतिनिधी
भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणकर यांनी श्री माऊली महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था नंदेश्वर या संस्थेला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन आण्णासाहेब बंडगर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी ईश्वरवठारचे सरपंच नारायण देशमुख, रासप नेते पंकज देवकते यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे येथील तनिष आयकॉन गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन रुक्मिणी दोलतडे, बाळकृष्ण माऊली सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुलिंग दोलतडे, माजी मुख्याध्यापक लवटे, सुभेदार बिरा दोलतडे, पोलीस पाटील संजय गरंडे, गुरुमाऊली पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब मोटे, प्रा.गणेश जोरवर-पाटील, दिगंबर गरंडे हे यावेळी उपस्थित होते.

***************
ग्रामीण भागात पतसंस्था चालवणे अत्यंत जिकरीचे ठरत असताना नंदेश्वर येथील श्री माऊली पतसंस्थेने अल्पावधीत मिळवलेले यश हे प्रशंसनीय आहे. चार दोन महिन्यात कोट्यावधी रुपयांचे कर्ज वाटप आणि त्यापेक्षा मोठी ठेवी इतका व्यवहार आजपर्यंत श्री माऊली पतसंस्थेने केला आहे. या संस्थेचे चेअरमन व तसेच सर्व संचालक मंडळ हे कौतुकास पात्र आहेत.
माऊली हळणवर
भाजपा नेते





















