Homeताज्या बातम्यामंगळवेढा तालुक्यातील पोलीस पाटील आमच्या रडारवर.. या संघटनेने दिला गर्भित इशारा..लमाणतांडा आणि...

मंगळवेढा तालुक्यातील पोलीस पाटील आमच्या रडारवर.. या संघटनेने दिला गर्भित इशारा..लमाणतांडा आणि भालेवाडी दोन गावच्या पोलीस पाटलांविरोधात तक्रार..

मंगळवेढा(प्रतिनिधी)
कायद्याचे रक्षण करण्यासाठी गावोगावी शासनाने जे पोलीस पाटील नेमले आहेत ते पोलीस पाटीलच आज कायदा मोडताना दिसत आहेत. अशा पोलीस पाटलांवर कारवाई करण्यापेक्षा काही पोलीस अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत अशा सर्वांवर कारवाई व्हावी. इतकेच नाहीतर मंगळवेढा तालुक्यातील तब्बल २९ पोलीसपाटील आमच्या रडारवर आहेत त्यांच्या विरोधात लवकरच पुरावे देऊन कारवाईसाठी मागणी करणार असल्याचे निवेदन मंगळवेढा तालुक्यातील प्रहार संघटनेच्या वतीने प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले आहे. लवकरात लवकर संबंधितावर कारवाई नाही झाली तर मंगळवेढा तालुक्यातील विविध कार्यालयासमोर भांडणात आंदोलन करणार असल्याचा इशारा तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देतेवेळी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी, तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, सचिन सरवदे, अण्णासो पाटील, रोहिदास कांबळे उपस्थित होते.

मंगळवेढा तालुक्यातील लमाणतांडा पोलीस पाटील हे सध्या चांगलेच प्रकरण गाजत आहे. मौजे लामाणतांडा येथील पोलीस पाटील यांचे अनेक करारनामे उजेडात प्रहारने आणले आहेत. हा पोलीस पाटील बोगस डॉक्टरकी करत होता. हे संपूर्ण डोणज, नंदुर, कात्राळ , कर्जाळ, लमाणतांडा या गावातील नागरिकांना माहिती असूनही हे प्रकरण दाबले. यावर प्रहार शांत बसला नाही त्या पोलीस पाटलाचे दारू धंदे सुरू आहेत हे कळविले त्याने ते माझे नाहीत म्हणून उडवून लावले. नंतर तो स्वतः मन्ना नावाचा जुगार चालवत असलेला व्हिडिओ मंगळवेढा पोलीस स्टेशनला पाठविला त्यातही त्याने मी पैशावर खेळत नाही असा जबाब देऊन पळवाट काढली. पोलिसांनी पोलीस पाटील सोडला पण त्याच्यावर भांडणे मारामारी असे अनेक प्रकारे गुन्हे आहेत तरीही तो पोलीस पाटील कसा असा प्रश्न थेट प्रांताधिकारी यांना प्रहारने विचारला आहे.

यामध्ये जे पोलीस अधिकारी पोलीस पाटील यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांच्यावरही प्रहार आवाज उठवणार आहे. कारण चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम मंगळवेढा पोलीस स्टेशन मधील कर्मचारी करीत आहेत. हे स्पष्ट दिसून आले आहे त्यामुळे आता लमाणतांडाचे पोलीस पाटील हे मोठ्या संकटात सापडले आहेत. तर दुसरीकडे भालेवाडीचे पोलीस पाटील यांची यांनी तर अजब गावची गजब कहानी अशी कथाच लिहिली आहे यांनी थेट शासनाची फसवणूक करत ठेकेदार बनला आहे. यांनी पोलीस पदाचा राजीनामा देऊन ठेकेदारी हा व्यवसाय करायचा पण त्यांनी दोन्ही व्यवसाय सुरू केली आहेत.

त्यांनी मारोळी येथे प्लेविंग ब्लॉक बसविणे, गाव अंतर्गत सीसीची कामे करणे, लघुनळ पाणीपुरवठा करणे, शौचालय बांधणे, रस्ते करणे अशी अनेक छोटी मोठी कामे अनेक वर्षे झाली तो करीत आहे. त्यामुळे याचीही हकालपट्टी करणे गरजेचे आहे. पोलीस पाटील पदावर ती असताना कोणत्याही निवडणुकीत भाग घ्यायचा नसतो पण हे दोघेही जणू स्वतः निवडणूक लढवीत आहोत असे म्हणून भाग घेत असतात. त्यामुळे या दोघांचीही गैरवर्तणूक सिद्ध झाली आहे. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी प्रहारने आता रीतसर मागणी केली आहे. त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील २९ पोलीस पाटील हे प्रहारच्या रडारवर आहेत असेही मंगळवेढा तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितले.
{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!