Homeराजकीयमाजी मंत्री आ.तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात होणार प्रवेश?? उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे...

माजी मंत्री आ.तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात होणार प्रवेश?? उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी घेतली आमदार तानाजी सावंत यांची भेट…

* राजकीय वर्तुळात चर्चा.. समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण..

(टीम सोलापूर आजतक)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळातील खांदेपालटाविषयी जोरदार चर्चा सुरु आहेत. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे वारंवार ‘सेल्फ गोल’ करत असल्याने त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.
येत्या काही दिवसांमध्ये माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची कृषीमंत्रिपदावरुन उचलबांगडी होईल, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावरही गंडांतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्रिपदावरुन दूर केल्यास त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात आणले जाऊ शकते, अशी हवा पसरली आहे. परंतु, आता या सगळ्या शक्यतांना फाटा देत राज्य मंत्रिमंडळात सध्या अज्ञातवासात असलेल्या नेत्याची वाईल्ड कार्ड एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे नाव अचानक मंत्रिमंडाळासाठी चर्चेत आले आहे. त्याला कारण आहे एकनाथ शिंदे यांनी घेतलेली तानाजी सावंत यांची भेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरी जात भेट घेतल्याने ही भेट राजकीय बदलाचे संकेत मानले जात आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने गेल्या नऊ महिन्यांपासून नाराज असलेल्या तानाजी सावंत यांच्या घरी जात एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. याच भेटीमुळे मंत्रिमंडळ विस्तारात तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रीपद मिळणार असल्याची भाकितं वर्तवली जाऊ लागली आहेत. एकना शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या भेटीचे फोटो समोर आल्याने सावंत समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे तानाजी सावंत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. मात्र, या भेटीकडे राजकीय बदलांचे संकेत म्हणून पाहिले जात आहे. मात्र, तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात घ्यायचे झाल्यास कोणत्या विद्यमान मंत्र्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार, याचीही आता चर्चा सुरु झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वखर्चातून रस्ते दुरुस्तीचा धडाका; बापूसाहेब गरंडे यांची सामाजिक बांधिलकी, नंदेश्वर गावासह परिसरात चर्चा

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. खड्डेमय झालेल्या या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी...

मंगळवेढा भूषण पुरस्काराने संपादक दिगंबर भगरे सन्मानित, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे दिगंबर भगरे यांचेवर सर्व...

मंगळवेढा / बाबासाहेब सासणे श्री दामाजी संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘मंगळवेढा भूषण’ पुरस्कार दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे यांना प्रदान करून त्यांच्या...

अनाथ व गरीब कुटुंबातील मुलांना शालेय शिक्षणासोबतच वारकरी संस्कारांचे मोफत शिक्षण देण्याचा उपक्रम, नंदेश्वर...

नंदेश्वर / प्रतिनिधी : समाजातील अनाथ, निराधार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार घडविण्याच्या उद्देशाने नंदेश्वर येथे...

कौतुकास्पद…प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने मसनेरवस्ती शाळेत स्पोर्ट्स किटचे वाटप, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून...

नंदेश्वर / प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसनेरवस्ती येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. प्रेरणा स्पोर्ट गारमेंटचे...

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

error: Content is protected !!