अजय अदाटे म्हणजे कृषी क्षेत्राला लागभलेला कोहिनूर हिरा – अनिल सावंत
नंदेश्वर /प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्याचे सुपुत्र असणारे अजय अदाटे यांचे कृषी क्षेत्रातील कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर व्यापले आहे. अगदी तंतोतंत, योग्य आणि रामबाण असा सल्ला देणारे अजय अधाटे हे जणू शेतकऱ्यांचे मसीहा बनले आहेत. त्यामुळेच अजय अदाटे हे कृषी क्षेत्राला लाभलेला कोहिनूर हिरा आहे असेच म्हणावे लागेल असे गौरवोद्गार भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी काढले.

दै.दामाजी एक्सप्रेस तर्फे दिला जाणारा कृषी क्षेत्रातील राज्यस्तरीय “महाराष्ट्र गौरव” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ॲग्रीकॉस कंपनीचे संचालक अजय अदाटे यांना प्राप्त झाला आहे. त्यानिमित्त अदाटे यांचा अनिल सावंत यांचे हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सावंत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, संतोष रंधवे, जमीर इनामदार यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत केलेल्या कार्याची ही सन्माननीय पावती आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत शेती आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त उत्पादने उपलब्ध करून देणाऱ्या त्यांच्या सेवाभावाला हा पुरस्कार समर्पक ठरतो.
अनिलदादा सावंत जनसंपर्क कार्यालयात याप्रसंगी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





















