Homeशिक्षण-प्रशिक्षणबाळकृष्ण विद्यालयाची पोरं भारी.. अटीतटीच्या अंतिम सामन्यात बाळकृष्ण विद्यालयाच्या खेळाडूंनी मिळवला विजय,...

बाळकृष्ण विद्यालयाची पोरं भारी.. अटीतटीच्या अंतिम सामन्यात बाळकृष्ण विद्यालयाच्या खेळाडूंनी मिळवला विजय, तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न

(सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क)
श्री बाळकृष्ण विद्यालय, नंदेश्वर येथे झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन श्री बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मंगळवेढा तालुक्याचे क्रीडाधिकारी दत्तात्रय वरकड, श्री बाळकृष्ण विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल एकमल्ली माजी उपसभापती दादासाहेब गरंडे, माजी उपसरपंच वसंत बंडगर, माजी सरपंच गेणा दोलतडे, युवक नेते वसंत गरंडे, बाळकृष्ण माऊली सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुलिंग दोलतडे, आप्पासाहेब मेटकरी, ग्रामपंचायत सदस्य तानाजी मोटे, भगवान गरंडे, बबलू गरंडे यांची उपस्थिती लाभली. श्री बाळकृष्ण विद्यालय व जुनिअर कॉलेजचे सर्व सहशिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्पर्धेचे सामने अत्यंत चुरशीचे झाले. यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्य दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली.

स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे:
🔹 १४ वर्षांखालील वयोगट (मुले):
अंतिम सामना श्री बाळकृष्ण विद्यालय, नंदेश्वर आणि बाळकृष्ण विद्यालय, भाळवणी यांच्यात झाला. नंदेश्वर विद्यालयाने दोन गुणांच्या फरकाने विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
🔹 १७ वर्षांखालील वयोगट (मुले):
या गटात शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर, पाटखळ आणि माचनूर यांच्यात अंतिम सामना झाला. पाटखळ विद्यालयाने उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक मिळवला.
🔹 १९ वर्षांखालील वयोगट (मुले):
या गटातील अंतिम सामना श्री बाळकृष्ण विद्यालय, नंदेश्वर व माध्यमिक आश्रम शाळा, खवे यांच्यामध्ये होणार होता. मात्र, पावसाच्या अडथळ्यामुळे सामना पुढे ढकलण्यात आला असून तो २७ सप्टेंबर रोजी मंगळवेढा येथील क्रीडा संकुलात होणार आहे.
या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी मिळाली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्री बाळकृष्ण विद्यालयाच्या व्यवस्थापन, प्राचार्य, क्रीडा शिक्षकांचे कौतुक होत आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी क्रीडाशिक्षक मनोहर बंडगर, नवनाथ मेटकरी, सहकारी मार्गदर्शक शिक्षक पवनकुमार पाडवी, किरण नागणे, गिरजाप्पा चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी बाळकृष्ण विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल एकमल्ली, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नंदेश्वर मधील ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!