Homeराजकीयमंगळवेढा उपसा सिंचन योजनेबाबत अफवा पसरवणाऱ्यांनी प्रत्यक्ष काम पाहावे, आ. समाधान आवताडे...

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेबाबत अफवा पसरवणाऱ्यांनी प्रत्यक्ष काम पाहावे, आ. समाधान आवताडे यांची भोसे गटाचे उमेदवार प्रदीप खांडेकर आप्पासो निकम यांच्या प्रचारार्थ नंदेश्वर येथे सभा

नंदेश्वर / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील दुष्काळी २४ गावांसाठी वरदान ठरणाऱ्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेबाबत विरोधकांकडून जाणीवपूर्वक शंका-कुशंका पसरवल्या जात आहेत. मात्र अशा अफवा पसरवणाऱ्यांनी योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम ज्या ठिकाणी युद्धपातळीवर सुरू आहे, तेथे स्वतः जाऊन प्रत्यक्ष पाहावे, असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी केले.

दुष्काळी भागाला हिरवा शालू नेसविल्याशिवाय शांत बसणार नाही – आ. समाधान आवताडे
नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथे भोसे जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार प्रदीप खांडेकर व पंचायत समिती गणाचे उमेदवार आप्पासो निकम यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
आ. आवताडे पुढे म्हणाले की, विरोधकांकडून विकासकामांबाबत दिशाभूल करणारे आरोप केले जात असून जनतेने अशा अफवांना बळी न पडता प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घ्यावी. विधानसभेतील माझ्या पहिल्या भाषणात मी सांगितल्याप्रमाणे आम्ही दुष्काळात जन्मलो दुष्काळात मरणार नाही या शब्दाशी मी प्रामाणिक राहून मंगळवेढ्याच्या दुष्काळी भागाला हिरवा शालू नेसल्याशिवाय शांत बसणार नाही या विधानाचा पुनरुचार केला.

आ.आवताडे यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना दिला समान न्याय – गुरुलिंग दोलतडे
माजी ग्रा.पं.सदस्य गुरुलिंग दोलतडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, आमदार हा कोण्या एका पार्टीचा नसतो तो संपूर्ण मतदारसंघाचा असतो हे आ.आवताडे यांनी दाखवून दिले आहे. आम्ही याआधी आ.आवताडे यांना निवडणूक प्रक्रियेत कधीही सहकार्य केले नाही. पण सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही ज्या ज्या वेळी आ.आवताडे यांच्याकडे पाठपुरावा करतो त्यांनी त्यावेळी कधीही दुजाभाव केला नाही.

भोसे गटाला प्रदीप खांडेकर यांच्या नेतृत्वाची गरज – अशोक चौंडे
माजी तालुकाप्रमुख अशोक चौंडे म्हणाले की, आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप खांडेकर यांनी सभापती काळात संपूर्ण मंगळवेढा तालुक्याला मोठ्या प्रमाणावर निधी दिला. यामध्ये भोसे जिल्हा परिषद गटाला सर्वाधिक निधी दिला. असा माणूस परका कसा असू शकतो. भोसे जिल्हा परिषद गटाला प्रदीप खांडेकर यांच्या नेतृत्वाची गरज आहे.

मनसेचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे यांचा प्रदीप खांडेकर यांना पाठिंबा
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे यांनी भोसे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रदीप खांडेकर आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार आप्पासो निकम यांना पाठिंबा दिला. यावेळी औदुंबर वाडदेकर, भिवा दोलतडे, जयसिंग कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दामाजी कारखान्याचे संचालक तानाजी काकडे, औदुंबर वाडदेकर, भिवा दोलतडे, माजी जि.प.सदस्य नामदेव जानकर, बापूसाहेब गरंडे, माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे, उपसरपंच आनंदा पाटील, मनसेचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आकाश डांगे, ऊसतोड ठेकेदार संघटनेचे तालुक्यातील दामाजी बंडगर, युवक नेते दत्ता साबणे यांचेसह नंदेश्वर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रश्नच शिल्लक ठेवणार नाही – प्रदीप खांडेकर
उमेदवार प्रदीप खांडेकर म्हणाले की, मला तुम्ही एक वेळ भोसे जिल्हा परिषद गटात संधी द्या. आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसे गटात प्रश्नच शिल्लक ठेवणार नाही. मी माझ्या सभापती काळात भोसे जिल्हा परिषद गटाला झुकते माप दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!