Homeराजकीयभोसे जि. प. गटातील भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून द्या, तुमच्या विकासाची जबाबदारी...

भोसे जि. प. गटातील भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून द्या, तुमच्या विकासाची जबाबदारी माझी पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचे आवाहन, भोसे येथे भाजपच्या उमेदवारांचे प्रचारार्थ झालेल्या सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नंदेश्वर /प्रतिनिधी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून येणारे सदस्यांना आपापल्या गटाचा, गणांचा विकास करण्यासाठी ग्रामविकास खात्याकडे त्यांना पाठपुरावा करावा लागतो. आणि हे खाते माझ्याकडे आहे त्यामुळे भोसे जिल्हा परिषद गटातील भाजपचे उमेदवार प्रदीप खांडेकर, भोसे गणाचे उमेदवार आप्पासो निकम आणि रड्डे गणाचे उमेदवार दत्तात्रय कांबळे या तीन उमेदवारांना तुम्ही निवडून द्या तुमच्या भोसे जिल्हा परिषद गटाच्या विकासाची सर्वस्वी जबाबदारी जयकुमार गोरेची राहील असे प्रतिपादन पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी केले. भोसे तालुका मंगळवेढा येथे भोसे जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य सभेत ना. गोरे बोलत होते.

यावेळी आ.समाधान आवताडे, भाजपचे तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, दामाजी कारखान्याचे संचालक तानाजी काकडे, माजी जि.प.सदस्य नामदेव जानकर, गौडाप्पा बिराजदार, माजी उपसभापती सूर्यकांत ढोणे, दादासाहेब दोलतडे, तम्माकाका चौगुले, भारत गरंडे, बिरुदेव घोगरे, यशवंत खताळ, अनिल गरंडे, माऊली बंडगर यांचेसह अनेक नेते पदाधिकारी उपस्थित होते.

ना.जयकुमार गोरे यावेळी बोलताना म्हणाले की, आमदार समाधान आवताडे यांनी अगदी अल्पावधीत मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळवून 700 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी आ.आवताडे यांचा पाठपुरावा झपाटल्यासारखा असतो. भोसे आणि शिरनांदगी या दोन्ही गावांना नियमात बसत नसताना सुद्धा मोठा पाठपुरावा करून आम्ही तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला आहे हुन्नूर गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा या निवडणुकीचे आचारसंहिता संपल्यानंतर मिळवून देण्याचा मी शब्द देत आहे. याशिवाय म्हैसाळ योजनेचे पाणी भोसे गावाला व तसेच अन्य गावाला देण्याचा आमचा प्रयत्न आहे. निंबोणी येथील ग्रामीण रुग्णालय, नंदेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच भोसे जिल्हा परिषद गटातील सर्वच गावात वेगवेगळ्या सुविधा करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. विरोधी गटाकडून अनेक नेते वेगवेगळी न पूर्ण होणारे आश्वासने देण्यासाठी येणार आहेत. ते फक्त निवडणुका आल्यानंतरच लोकांसमोर येत आहेत. अशा मोकळ्या लोकांच्या मोकळ्या आश्वासनाला भोसे जिल्हा परिषद गटातील एकही मतदार भुलणार नाही याची आम्हाला खात्री आहे.

आमदार समाधान आवताडे म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे आपल्याला कोणत्याही योजना कोणतीही विकास कामे करण्यासाठी कसलीही अडचण येणार नाही. भोसे जिल्हा परिषद गटातील मतदारांनी भाजपच्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे हे आपल्याला निधीची कसलीही कमतरता भासू देणार नाहीत.

सभेला तुफानी गर्दी अन् ना.गोरे यांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
भोसे येथे भाजपचे उमेदवार प्रदीप खांडेकर, आप्पासो निकम, दत्तात्रय कांबळे यांच्या प्रचारार्थ ना. जयकुमार गोरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सायं.सहा वाजता सभा होणार होती पण पालकमंत्री गोरे यांना भोसे येथे सभास्थळी यायला रात्रीचे नऊ वाजले. पण सायंकाळी सहा वाजल्यापासून वाट बघत असलेले नागरिक रात्री नऊ वाजेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. पालकमंत्री ना.गोरे यांनी भाषण सुरू केल्यानंतर त्यांच्या भाषणाला उपस्थित असलेल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उशीर होऊन देखील उपस्थित असणाऱ्यांची संख्या पाहून व तसेच भाषणाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ना.गोरे यांच्या भाषणात देखील उत्साह जाणवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!