Homeआरोग्यमंगळवेढ्यात आरोग्यसेवेचा नवा आधारवड बेलदार हॉस्पिटल, अल्पावधीतच ठरले विश्वासार्ह

मंगळवेढ्यात आरोग्यसेवेचा नवा आधारवड बेलदार हॉस्पिटल, अल्पावधीतच ठरले विश्वासार्ह

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात आरोग्यसेवेच्या क्षेत्रात अल्पावधीतच ठसा उमटवणारे बेलदार हॉस्पिटल सध्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत या हॉस्पिटलने केलेली कामगिरी उल्लेखनीय असून, जवळपास १५ रुग्णांचे अत्यंत किचकट आणि जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडत रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे.

दोन महिन्यातच तब्बल २५० रुग्ण आयसीयुमध्ये दाखल होऊन सुखरूप घरी परतले तर पंधरा रुग्णांची अत्यंत किचकट आणि जटील शस्त्रक्रिया यशस्वी
या काळात सुमारे २५० हून अधिक रुग्णांना आयसीयू विभागात दाखल करून त्यांच्यावर प्रभावी उपचार करण्यात आले असून, उपचारानंतर हे रुग्ण सुखरूप घरी परतले आहेत. ही बाब हॉस्पिटलच्या कार्यक्षमतेचे आणि डॉक्टरांच्या कौशल्याचे द्योतक मानली जात आहे. बेलदार हॉस्पिटलची खासियत म्हणजे अत्याधुनिक सुविधा. सुसज्ज आयसीयू, आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्वच्छता आणि आकर्षक रचना यामुळे हे हॉस्पिटल मंगळवेढा तालुक्यातील एक आदर्श आरोग्यकेंद्र म्हणून उदयास आले आहे. ग्रामीण भागात अशा दर्जेदार सुविधा उपलब्ध होणे ही मोठी बाब मानली जात आहे. फक्त मंगळवेढा तालुकाच नव्हे, तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील रुग्ण या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत आहेत. कमी खर्चात दर्जेदार उपचार मिळत असल्यामुळे गरिबांसाठी हे हॉस्पिटल आधारवड ठरत आहे, तर आधुनिक सुविधा आणि सेवा यामुळे सुस्थित रुग्णांचाही विश्वास येथे वाढत आहे.

बेलदार दांपत्याने मंगळवेढा तालुक्यातील रुग्णांच्या आरोग्यसेवेचा उचलला विडा
हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सचिन बेलदार हे रुग्णांना अत्यंत समर्पित भावनेने सेवा देत असून, त्यांच्या अनुभव आणि कौशल्यामुळे अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. तसेच, डॉक्टर अपेक्षा बेलदार या बालरोग तज्ञ म्हणून लहान मुलांना योग्य आणि प्रभावी उपचार देत आहेत. त्यांच्या सेवेमुळे पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. बालरोग तज्ञ डॉक्टर अपेक्षा बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांच्या अत्यंत जटिल अशा शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय लहान मुलांचे व नवजात शिशु बालकांचे सुसज्ज असे अतिदक्षता विभाग व आधुनिक लसीकरण सुद्धा बेलदार हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे.

एकूणच, मंगळवेढा येथील शिशुविहार समोर श्रीराम मार्ट जवळ दामाजीनगर येथे सुरू असलेल्या आणि अत्यल्प कालावधीतच मंगळवेढा आणि परिसरातील नागरिकांचा विश्वास जिंकला असून, भविष्यातही बेलदार हॉस्पिटल आरोग्यसेवेच्या क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!