Homeताज्या बातम्यानंदेश्वर-जुनोनी मार्गालगतची धोकादायक विहीर ग्रामस्थांच्या चिंतेचा विषय; तातडीने बुजविण्याची मागणी, शाळकरी विद्यार्थी,...

नंदेश्वर-जुनोनी मार्गालगतची धोकादायक विहीर ग्रामस्थांच्या चिंतेचा विषय; तातडीने बुजविण्याची मागणी, शाळकरी विद्यार्थी, नागरिक आणि बुद्ध विहारात येणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर गावालगत तसेच नंदेश्वर-जुनोनी मार्गालगत असलेली एक जुनी विहीर सध्या ग्रामस्थांसाठी मोठा धोक्याचा विषय ठरत आहे. ही विहीर अगदी रस्त्याच्या कडेला असून तिच्या आसपास कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे या विहिरीपासून काही अंतरावरच नंदेश्वर गावातील श्री बाळकृष्ण विद्यालय असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या परिसरातून राज्य महामार्गाचे काम सुरू असून, विहिरीच्या अगदी कडेलाच रस्ता विकसित केला जात आहे. मात्र रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वी या धोकादायक विहिरीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

तांदुळवाडीसारखी दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना करा
अलीकडेच तांदुळवाडी येथे रस्त्यालगत असलेल्या विहिरीत बुडून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात रस्ता बांधकामादरम्यान ठेकेदाराने पुरेशी सुरक्षा उपाययोजना न केल्याचा आरोप होत असून संबंधित ठेकेदारावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील अशा धोकादायक विहिरींकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर नंदेश्वर येथील विहिरीबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. “तांदुळवाडीसारखी दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना करा,” अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

याआधी टळली होती मोठी दुर्घटना
विशेष म्हणजे सुमारे दोन वर्षांपूर्वी नंदेश्वरहून मंगळवेढाकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली एसटी बस या विहिरीत कोसळता-कोसळता थोडक्यात बचावली होती. त्या बसमध्ये जवळपास ३० प्रवासी होते. त्या वेळी मोठी दुर्घटना टळली असली, तरी हा प्रकार ग्रामस्थांच्या स्मरणात आजही ताजा आहे.

किरकोळ उपाययोजना न करता विहीर बुजविण्याची ग्रामस्थांची मागणी
विहिरीच्या एका बाजूला रस्ता असून दुसऱ्या बाजूला नंदेश्वर येथील बौद्ध बांधवांनी उभारलेले बुद्ध विहार आहे. येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांवेळी लहान मुलांची मोठी उपस्थिती असते. त्यामुळे या विहिरीमुळे त्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. याशिवाय गावालगतच वस्ती असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, या विहिरीचा सध्या गावाला कोणताही उपयोग नसून केवळ सुरक्षा कठडा किंवा भिंत बांधून हा प्रश्न सुटणार नाही. भविष्यातील मोठा धोका टाळण्यासाठी ही विहीर पूर्णपणे बुजविणे हाच एकमेव कायमस्वरूपी उपाय असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. आता प्रशासन व संबंधित विभाग याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतात आणि रस्ता पूर्ण होण्यापूर्वी या विहिरीचा प्रश्न मार्गी लागतो का, याकडे संपूर्ण नंदेश्वर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!