Homeसामाजिकनंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त होणार व्याख्यान

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. बापूसाहेब मेटकरी यांनी दिली.

हा कार्यक्रम बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मंगळवेढा तालुक्यातील श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, नंदेश्वर येथे संपन्न होणार आहे. “आजचा विद्यार्थी आणि उद्याचे भविष्य” या अत्यंत समर्पक व विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या विषयावर नितीन चंदनशिवे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वशैलीतून विद्यार्थ्यांना शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक जाणीव, ध्येय निश्चिती आणि यशस्वी जीवनाचा मंत्र मिळणार असल्याने या व्याख्यानाबाबत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

बहुजन गौरव प्रतिष्ठान, समाई फाउंडेशन तसेच श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, नंदेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा दर्जेदार व्याख्यानांचे आयोजन सातत्याने व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.या कार्यक्रमास परिसरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. बापूसाहेब मेटकरी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

हून्नूर येथे जि. प. सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १०० टक्के अनुदानावर वैरण...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील हून्नूर येथे मतदारसंघाचे आ. समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती मंगळवेढा यांच्या...

नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगतची धोकादायक विहीर बुजविण्यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने बोलाविली विशेष ग्रामसभा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न...

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगत आणि नंदेश्वर गावाच्या हद्दीत असलेली धोकादायक विहीर तातडीने बुजविण्याच्या मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने विशेष...

error: Content is protected !!