Homeसामाजिकस्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब...

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी नागरिकांची सातत्याने मागणी होती. मात्र, शासकीय यंत्रणेकडून दुरुस्तीला विलंब होत असल्याने अखेर नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांनी पुढाकार घेत हा संपूर्ण रस्ता स्वखर्चातून दुरुस्त करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.

या दुरुस्तीच्या कामाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, शिवसेना माजी तालुकाप्रमुख अशोक चौंडे, माजी सरपंच वसंत गरंडे, वसंत बंडगर, मधुकर गरंडे, धाडस ग्रुपचे अध्यक्ष अंकुश गरंडे, ग्रामपंचायत सदस्य पिंटू बंडगर, युवक नेते वसंत गरंडे, चेतना पतसंस्थेचे व्हा.चेअरमन लखन गरंडे यांच्यासह नंदेश्वर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासकीय मदतीची वाट न पाहता स्वखर्चातून केली दुरुस्ती
नंदेश्वर ते वाणीचिंचाळे हा मार्ग परिसरातील नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा होत असते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने आणि रस्ता खराब झाल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. विशेषतः पावसाळ्यात या समस्येत आणखी भर पडत होती. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन बापूसाहेब गरंडे यांनी कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता स्वतःच्या खर्चातून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. तब्बल दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरुस्ती करून त्यांनी नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.

सर्व स्तरातून कौतुक
यावेळी उपस्थित मान्यवरांनी बापूसाहेब गरंडे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. केवळ आश्वासनांवर न थांबता नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्या स्वतःच्या खर्चातून सोडविण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. सामाजिक कार्याची परंपरा जपत बापूसाहेब गरंडे यांनी केलेल्या या उपक्रमाचे नंदेश्वरसह परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

नंदेश्वर गावाच्या जडणघडणीत गरंडे कुटुंबीयांचे योगदान
माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांचे कनिष्ठ बंधू युवक नेते वसंत गरंडे यांनी याआधी नंदेश्वर येथील हातपंपाची दुरुस्ती स्वखर्चाने केली होती. यावेळी या आठवणींना ग्रामस्थांच्या वतीने उजाळा देण्यात आला. तसेच धाडस ग्रुपचे अध्यक्ष अंकुश गरंडे हे देखील नंदेश्वर गावच्या सामाजिक कार्यात व तसेच राजकारणात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळे संपूर्ण गरंडे परिवाराचे नंदेश्वर गावच्या सामाजिक कार्यात राजकारणात मोठा सहभाग व वाटा असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

error: Content is protected !!