Homeशिक्षण-प्रशिक्षणबंडू गडदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा होणार सन्मान, जिल्हास्तरीय शिक्षण भूषण...

बंडू गडदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा होणार सन्मान, जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार जाहीर

मंगळवेढा / प्रतिनिधी : दैनिक दामाजी एक्सप्रेस तर्फे भव्य जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असून, “दैनिक दामाजी एक्सप्रेस सोलापूर भूषण पुरस्कार २०२६” प्रदान करून समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाणार आहे.

यंदाच्या पुरस्कारासाठी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शिरनांदगी गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू इंडियन गुरुकुल स्कूल, आर्ट सायन्स कॉमर्स ज्युनिअर कॉलेज, सैनिकी निवासी पॅटर्न स्कूल शिरनांदगी (ता. मंगळवेढा जि. सोलापूर) संस्थापक बंडू शंकर गडदे यांची अत्यंत मानाचा समजल्या जाणाऱ्या “शिक्षण भूषण पुरस्कार” या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

हा गुणगौरव सोहळा दैनिक दामाजी एक्सप्रेस सोलापूर भूषण पुरस्कार २०२६ अंतर्गत रविवार, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
सोहळ्यात पुरस्कार वितरणासोबतच मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषण, तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेणारे सत्र आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे, तसेच नव्या पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श उभा करणे हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहनही दैनिक दामाजी एक्सप्रेसतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गंगाबाई करे यांचे दुर्दैवी निधन, अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली केली अर्पण

नंदेश्वर/ प्रतिनिधी : गंगाबाई मारुती (चिमा) करे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. त्या ग्रामपंचायत सदस्य तसेच...

लोहार समाजाच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल; मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रीमंडळाचा लोहार समाजाच्या वतीने...

मुंबई / विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या “ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंदपुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ” या लोहार...

लोकशाहीर दादाभाई शेख यांचे दुर्दैवी निधन, खडकी गावासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावाच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारे, आपल्या शाहिरीच्या दमदार आवाजाने गेली तब्बल ४५ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खडकीचे नाव...

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय...

error: Content is protected !!