Homeउद्योगबाबुराव डांगे यांची प्रेरणादायी यशोगाथा - कर्तृत्व, कष्ट आणि नशिबाचा संगम

बाबुराव डांगे यांची प्रेरणादायी यशोगाथा – कर्तृत्व, कष्ट आणि नशिबाचा संगम

संकलन/पत्रकार बाबासाहेब सासणे✍️✍️✍️✍️
बाबुराव डांगे… एक साधा, सरळ, सामान्य घरातून आलेला युवक. शाळेत असताना ना फारसा अभ्यासात हुशार, ना शिस्तीचा तसा आवडता विद्यार्थी. पण मनात काहीतरी करून दाखवण्याची सुप्त इच्छा होती. परिस्थितीने त्याला लवकरच जबाबदाऱ्या शिकवल्या आणि आयुष्याच्या रस्त्यावर तो कुठे वळला हे त्याच्या यशाची कहाणी सांगते. शाळेच्या वेळेस बाबुराव ना नियमांचे फारसे पालन करायचा, ना पुस्तकात डोके खुपसायचा. पण जिथे मन लागतं तिथे माणूस झोकून देतो असं म्हणतात – बाबुरावच्या बाबतीत हे अगदी खरं ठरलं. शिक्षणात नाही पण आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं ठरवलं होतं त्याने.

जीवनातील पहिला मोठा निर्णय..
बाबुरावचा खरा संघर्ष सुरू झाला तेव्हा, जेव्हा त्याने एका अनाथ मुलीशी प्रेम केलं आणि लग्न केलं. समाजाच्या आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन. आई-वडिलांशी संबंध तुटले, कुणाचंही पाठबळ नव्हतं. त्यावेळी त्याच्या हातात ना पैसा होता, ना स्थैर्य. पण त्याच्याकडे होती ती एक गोष्ट – जिद्द

गोव्यात झाली जडणघडण…
जिथे स्वतःच्या गावात आधार नव्हता, तिथे भविष्याची घडण शक्य नव्हती. म्हणून बाबुराव पत्नीसह गोवा गाठतो. सुरुवातीला हातात कसलेही कौशल्य किंवा शिक्षण नसल्यामुळे त्याने रोजंदारीवर मजुरीची कामं केली. उन्हातान्हात राबत, दिवस रात्र एक करत तो काम करत राहिला. कामाबद्दलची प्रामाणिकता, वेळेचं भान आणि मेहनतीची तयारी यामुळे हळूहळू लोक त्याच्याकडे लक्ष देऊ लागले.

रोजंदारीवरून ठेकेदारीकडे..
काही वर्षांमध्ये बाबुरावने स्वतःचं काम सुरू केलं. आधी छोट्या कामांच्या ठेकेदारीत पाऊल टाकलं, आणि मग यशाच्या पायऱ्या चढत गेला. लोकांच्या विश्वासाला जागून, योग्य वेळेवर काम पूर्ण करून दिल्यामुळे त्याची बाजारात ओळख निर्माण झाली. आज बाबुराव डांगे हा गोवा राज्यात एक यशस्वी ठेकेदार म्हणून ओळखला जातो. त्याच्या कष्टांनी त्याची आर्थिक स्थिती भक्कम झाली आहे. घरदार, व्यवसाय, प्रतिष्ठा – हे सगळं त्याने स्वतःच्या हाताने उभं केलं.

कर्तृत्व म्हणजे काय?
बाबुरावची कहाणी हेच शिकवते की यश मिळवण्यासाठी केवळ शाळेतील गुण महत्वाचे नसतात. माणसाचे खरे गुण – प्रामाणिकपणा, चिकाटी, मेहनत, आणि योग्य वेळी घेतलेले धाडसी निर्णय – हेच त्याला यशाच्या शिखरावर नेतात. आज दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या वतीने बाबुराव डांगे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इतकेच नाही तर गोवा राज्यातील सलग तीन वेळा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने हे बाबुराव डांगे यांना सन्मानित करण्यात आले आहे.बाबुराव डांगे याने हेच करून दाखवलं आहे. शिक्षणात “ढ” असल्याचं टॅग ज्यांना लागलेलं असतं, अशांसाठी तो एक जिवंत उदाहरण आहे की, आयुष्यातली खरी परीक्षा फळ देणारी असते तेव्हा, जेव्हा माणूस कष्टाच्या जोरावर स्वतःचं नशीब बनवतो.
शेवटी एवढंच म्हणता येईल –यश हे नशिबावर नाही, तर कर्तृत्वावर अवलंबून असतं, आणि बाबुराव डांगे हे त्या कर्तृत्वाचं मूर्तिमंत उदाहरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!