Homeआरोग्यबेलदार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावंसं वाटतंय... बेलदार हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी आ.समाधान आवताडेंची मिश्किल...

बेलदार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावंसं वाटतंय… बेलदार हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी आ.समाधान आवताडेंची मिश्किल टिप्पणी, मंगळवेढा येथे बेलदार हॉस्पिटलचे आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते उद्घाटन

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
बेलदार हॉस्पिटलमधील स्वच्छता, सुव्यवस्था, आधुनिक साधनसामग्री व आकर्षक मांडणी पाहून “बेलदार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावंसं वाटतंय,” अशी हलक्याफुलक्या शब्दात व मिस्कील प्रतिक्रिया आमदार समाधान आवताडे यांनी उद्घाटन प्रसंगी दिली. मंगळवेढा येथे नव्याने सुरू झालेल्या बेलदार हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी आमदार समाधान आवताडे यांनी मिश्किल टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. अशा प्रकारची प्रतिक्रिया ही जरी हास्यस्पद असली तरी बेलदार हॉस्पिटलला भेट दिलेल्या प्रत्येक माणसाच्या तोंडातून ही प्रतिक्रिया आपसूक निघेल असेही यावेळी बोलताना आमदार आवताडे यांनी आवर्जून नमूद केले.

मंगळवेढ्याच्या वैद्यकीय क्षेत्राला लागेल ती मदत करू – आ. समाधान आवताडे
यावेळी बोलताना आ.आवताडे म्हणाले की, दवाखान्यांनी एकमेकांशी स्पर्धा न करता रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा व सुविधांमध्ये स्पर्धा करावी. उत्तम उपचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णकेंद्रित सेवा या बाबींवर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. बेलदार हॉस्पिटलसह मंगळवेढा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही आमदार आवताडे यांनी यावेळी दिले. त्यांच्या हस्ते बेलदार हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, लाईफलाईन हॉस्पिटलचे संचालक संजय देशमुख, नगराध्यक्षा सुनंदा आवताडे, प्रणव परिचारक, दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अजित जगताप, माजी सभापती प्रदीप खांडेकर,भैरवनाथ शुगरचे शेती अधिकारी कृष्णदेव लोंढे, बसवराज पाटील, भारत बेदरे , नगरसेवक प्रविण खवतोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर,ह.भ.प. सुदर्शन महाराज खडकीकर, नगरसेविका विद्या अवघडे, जमिर सुतार, कांतिलाल ताटे, उत्तम बेलदार, भाऊसाहेब बेलदार, खडकी चे माजी सरपंच रघुनाथ बेलदार, विशाल चौगुले हे उपस्थित होते.

मंगळवेढेकरांनी निश्चिंत राहावे – डॉ. संजय देशमुख
डॉ. सचिन बेलदार यांनी लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये सलग आठ वर्षे अतिशय निष्ठेने काम केले. या काळात त्यांनी खऱ्या अर्थाने रुग्णसेवा म्हणजे काय असते, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. जोपर्यंत डॉ. बेलदार आमच्या हॉस्पिटलमध्ये होते, तोपर्यंत आम्ही पूर्णपणे निश्चिंत असायचो. असा गुणी, सेवाभावी डॉक्टर आज मंगळवेढेकरांना मिळाला आहे, त्यामुळे येथील नागरिकांनी आरोग्य सेवेच्या बाबतीत नक्कीच निर्धास्त रहावे. अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना पंढरपूर येथील लाईफलाईन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. संजय देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली.

रुग्णकेंद्रित, विश्वासार्ह आणि परवडणारी आरोग्यसेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न – डॉ. सचिन बेलदार
मंगळवेढा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते श्रीमंतांपर्यंत प्रत्येक रुग्णाला दर्जेदार व योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. बेलदार हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णकेंद्रित, विश्वासार्ह आणि परवडणारी आरोग्यसेवा देण्याचा संकल्प आज उद्घाटनप्रसंगी करत असल्याची प्रतिक्रिया बेलदार हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. सचिन बेलदार यांनी केलेल्या प्रस्ताविकात दिली.

बेलदार कुटुंबीयांनी स्व.बाबासाहेब बेलदार यांचे स्वप्न पूर्ण केले – पांडुरंग चौगुले
मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी अहोरात्र झटलेले आणि पाणी संघर्ष समितीत महत्त्वाची भूमिका बजावलेले स्व. बाबासाहेब बेलदार यांचे स्वप्न बेलदार कुटुंबीयांनी पूर्ण केले. एक मुलगा रघुनाथ बेलदार हा राजकारण आणि समाजकारणात, लहान भाऊ भाऊसाहेब बेलदार प्रगतशील शेतकरी आणि घरात एखादा डॉक्टर असावा अशी स्व.बाबासाहेब बेलदार यांची असणारी इच्छा मोठा मुलगा डॉ.सचिन बेलदार आणि सून डॉ.अपेक्षा बेलदार यांनी यांनी पूर्ण केली. अशाप्रकारे बेलदार कुटुंबीयांनी स्व. बाबासाहेब बेलदार यांची इच्छा पूर्ण केली अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग चौगुले यांनी व्यक्त केली. उद्घाटनप्रसंगी मान्यवर, डॉक्टर, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने सुरू झालेल्या या हॉस्पिटलमुळे मंगळवेढा तालुक्यातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!