Homeराजकीय'भैरवनाथ'चा आशीर्वाद नेमका कोणाला मिळणार? अनिल सावंत यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष

‘भैरवनाथ’चा आशीर्वाद नेमका कोणाला मिळणार? अनिल सावंत यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष

भोसे / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधक ठरलेली भोसे जिल्हा परिषद गटाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे उमेदवार प्रदीप खांडेकर आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार बसवराज पाटील या दोघांकडूनही जोरदार तयारी आणि फिल्डवर्क सुरू आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे पाठिंबा, गटांत फूट, आडवळणाची राजकीय हालचाल या बाबी अधिक ठळकपणे दिसून येत आहेत.या सगळ्या राजकीय गणितांमध्ये भोसे जिल्हा परिषद गटात सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक घटक ठरत आहेत भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत. ते नेमका कोणाला पाठिंबा देणार, याकडे केवळ भोसे गटाचाच नव्हे तर संपूर्ण मंगळवेढा तालुक्याचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत अनिल सावंत यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिताताई भालके यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. केवळ पाठिंबा नव्हे, तर त्यांनी प्रामाणिकपणे निवडणूक व्यवस्थापनात मदत केल्याने सावंत हे अधिकृतपणे तीर्थक्षेत्र विकास आघाडीत असल्याचे चित्र त्यावेळी स्पष्ट झाले होते.

अनिल सावंत यांच्या उमेदवारीला कोणी घातला ‘खो’??
मात्र भोसे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत परिस्थिती वेगळी घडली. अनिल सावंत यांना याच गटातून उमेदवारी मिळेल, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना ठाम अपेक्षा होती. धनगर समाजाचे प्राबल्य असलेल्या या गटात जातीय समीकरणांचा सखोल अभ्यास करून सावंत यांनी निवडणुकीसाठी नियोजनही केले होते. मात्र ऐनवेळी त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला. हा विरोध नेमका कोणी केला, यावरून भोसे गटात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली.
विशेष म्हणजे, जवळ असणाऱ्यांनीच अनिल सावंत यांच्या उमेदवारीला ‘खो’ घातल्याची चर्चा सावंत समर्थक उघडपणे करीत आहेत. या घडामोडींमुळे अनिल सावंत यांना माघार घ्यावी लागली आणि ही माघार त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनाला चांगलीच लागली. अनेक वर्षांपासून ज्या नेत्यासाठी त्यांनी काम केले, त्यालाच डावलले गेल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.

अनिल सावंत यांचे भोसे जि. प. गटात मोठे काम
अनिल सावंत यांनी भोसे जिल्हा परिषद गटात गेल्या अनेक वर्षांत केलेले सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर उल्लेखनीय आहे. लवंगी येथे असलेल्या भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून त्यांनी भोसे गटातीलच जवळपास दोनशे कामगारांना थेट रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर अनेक गरजू आणि गोरगरीब कुटुंबांना त्यांनी स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत केली आहे. कला, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांना त्यांनी सातत्याने पाठबळ दिल्याने स्थानिक पातळीवर त्यांची मजबूत पकड आहे. अनिल सावंत यांना उघड पाठिंबा देणारे अनेक कार्यकर्ते गावोगावी तयार झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, भोसे जिल्हा परिषद गटातून अनिल सावंत निवडणूक लढवतील आणि जिंकतील, अशी अपेक्षा असताना उमेदवार निवडीतील नाट्यमय घडामोडींमुळे चित्र पूर्णपणे बदलले. आता सावंत थेट रिंगणात नसले, तरी ते या निवडणुकीतील ‘किंगमेकर’ ठरणार, हे मात्र निश्चितच मानले जात असल्याच्याही चर्चा सध्या होत आहेत.

अनिल सावंत यांचा पाठिंबा निर्णायक
भाजपचे उमेदवार प्रदीप खांडेकर असोत वा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार बसवराज पाटील दोघांसाठीही अनिल सावंत यांचा पाठिंबा निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे अनिल सावंत नेमका कोणाला आशीर्वाद देणार, यावरच भोसे जिल्हा परिषद गटाच्या निकालाची दिशा ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. आगामी काही दिवसांत सावंत यांची भूमिका स्पष्ट होताच या निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सत्कार

नंदेश्वर / प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी मंगळवेढा भाजप युवा मोर्चाकडून उत्साहपूर्ण तयारी करण्यात आली. मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथ...

सलग दुसऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत सासणे याने मिळविले उत्तुंग यश, सर्व स्तरातून अभिनंदन व...

नंदेश्वर / प्रतिनिधी : एन.एम.एम.एस. या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग असे यश मिळवित शिष्यवृत्तीस पात्र ठरल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या उच्च...

52 व्या हिंदकेसरी स्पर्धेत महेंद्र गायकवाडचा दमदार विजय; पृथ्वीराज मोहोळ दुखापतीमुळे माघार

सातारा / विशेष प्रतिनिधी : ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियम येथे रंगलेल्या 52 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शिरशी गावचा...

आदर्शवत लोकसहभाग ! खुपसंगी-आंधळगाव परिसरातील जळालेल्या झाडांना जीवनदान देण्याचा प्रेरणादायी उपक्रम, श्री कामसिद्ध शेडनेट...

नंदेश्वर / प्रतिनिधी : खुपसंगी-आंधळगाव हद्दीवरील वनिकरण क्षेत्रात अलीकडेच लागलेल्या भीषण आगीत अनेक झाडांचे मोठे नुकसान झाले. अनेक झाडे जळून खाक झाली असून उरलेली...

आदर्शवत लोकसहभाग….खुपसंगी-आंधळगाव परिसरातील जळालेल्या झाडांना जीवनदान देण्याचा प्रेरणादायी उपक्रम, श्री कामसिद्ध शेडनेट शेती शेतकरी...

error: Content is protected !!