Homeक्राईमभरदिवसा खून..भरदिवसा उपसरपंचाचा गळा चिरून खून...

भरदिवसा खून..भरदिवसा उपसरपंचाचा गळा चिरून खून…

सांगली: सांगलीच्या खानापूर तालुक्यातील घानवड येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. घानवडचे माजी उपसरपंच बापूराव देवप्पा चव्हाण यांचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गार्डी नेवरी रस्त्यावर हा थरारक प्रसंग घडल्याने परिसरात खळखळ उडाली आहे. बापूराव देवाप्पा चव्हाण हे घानवड गावचे माजी उपसरपंच आहेत, तसेच त्यांचे विटा येथे सोनार सिद्ध ज्वेलर्स या नावाने ज्वेलरीचे दुकान आहे. त्यांचा निर्घृण खून झाल्याने खळबळ उडाली आहे.
बापूराव देवाप्पा चव्हाण हे आपल्या बुलेट गाडीवरून नेवरी रस्त्यावरील पोल्ट्री शेडकडे निघाले होते. गार्डी गावाच्या लगत असलेल्या रस्त्यावर त्यांचा अज्ञाताने गळा चिरून खून केला. ही घटना रस्त्यावरून जाणाऱ्यांनी पाहिली त्यानंतर याची माहिती विटा पोलिसांना देण्यात आली.
तात्काळ या ठिकाणी विभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पोलीस पथक या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी संबंधित झालेल्या घटनेचा पंचनामा केला व हा खून कोणी केला याबाबत पोलीस तपास घेत आहेत. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बापूराव देवाप्पा चव्हाण ( वय 47) हे घानवड (ता. खानापूर) येथील माजी उपसरपंच आहेत. त्यांचा भरदिवसा धारदार शस्त्राने गळा चिरून खून झाल्याची घटना गार्डी (ता. खानापूर) येथे काल (गुरूवारी) दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गळ्यावर वार वर्मी बसल्याने ते जागीच ठार झाले. सदर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. बापूराव देवाप्पा चव्हाण हे पोल्ट्रीसह सराफ व्यवसाय करत होते. काल दुपारी ते घानवड येथून गार्डी – नेवरी रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या गार्डी हद्दीत असणाऱ्या त्यांच्या पोल्ट्री शेडकडे बुलेटवरून निघाले होते. तेव्हा त्यांच्यावरती वार करून त्यांचा खून करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एमएस धोनीने प्रभाव प्लेअर आयपीएल नियम, बोथट निर्णय दिला

2023 मध्ये इम्पॅक्ट प्लेयर आयपीएल नियमांबद्दल बोलले गेले आहे. उदाहरणार्थ, एका विशिष्ट संघाने गोलंदाजीची डाव पूर्ण केल्यावर, तो एका गोलंदाजांपैकी एकाला फलंदाजीसह बदलू शकतो....

घड्याळ: हट्टी अंडी शेल्स सोलून काढण्यावर हे तज्ञ हॅक इंटरनेट बोलत आहेत

फूड हॅक्स आम्हाला आश्चर्यचकित करण्यास कधीही अपयशी ठरतात. थर्मॉसच्या आत अॅल्युमिनियम-लपेटलेल्या पॅराथास ठेवण्यापासून जेणेकरून ते तूपात चमच्याने चमच्याने उबदार राहतात जेणेकरून मध त्यांच्यात अडकणार...

error: Content is protected !!