Homeराजकीयभोसे जिल्हा परिषद गटात प्रदीप खांडेकर यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार दौरा, सोमनाथ...

भोसे जिल्हा परिषद गटात प्रदीप खांडेकर यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार दौरा, सोमनाथ आवताडे यांची प्रमुख उपस्थिती

भोसे / विशेष प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रदीप खांडेकर यांच्या प्रचारासाठी गटात झंझावाती प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रचार दौऱ्याला मंगळवेढ्याचे नगरसेवक सोमनाथ अवताडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. गटातील विविध गावांमध्ये करण्यात आलेल्या या दौऱ्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले. प्रचार दौऱ्यादरम्यान गावोगावी भेटी देत उमेदवार प्रदीप खांडेकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. जिल्हा परिषदेमार्फत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांवर ठोस काम करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.

प्रदीप खांडेकर यांच्या नेतृत्वात भोसे गटाचा जलद गतीने विकास होईल – सोमनाथ आवताडे
नगरसेवक सोमनाथ आवताडे यांनी आपल्या भाषणात भाजपच्या विकासात्मक धोरणांचा उल्लेख करत सांगितले की, प्रदीप खांडेकर हे सर्वसामान्य जनतेशी जोडलेले नेतृत्व असून त्यांच्या माध्यमातून भोसे गटाचा विकास अधिक वेगाने होईल. भाजपच्या कार्यकाळातील विकासकामांची माहिती देत त्यांनी मतदारांना खांडेकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. या प्रचार दौऱ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, माजी शिवसेना तालुकाप्रमुख पै.अशोक चौंडे, माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे, युवक नेते जयसिंग कांबळे, दत्ता साबणे, मारुती गरंडे, आण्णासाहेब पाटील, महादेव करे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावा गावातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद
गावागावातील युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा वाढता सहभाग पाहता या प्रचार दौऱ्याने भोसे जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद आगामी निवडणुकीत निर्णायक ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगतची धोकादायक विहीर बुजविण्यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने बोलाविली विशेष ग्रामसभा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न...

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगत आणि नंदेश्वर गावाच्या हद्दीत असलेली धोकादायक विहीर तातडीने बुजविण्याच्या मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने विशेष...

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसाय समाविष्ट करा, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप...

नंदेश्वर | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर धोरणात मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसायाचा समावेश करावा, अशी मागणी...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नंदेश्वर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्रलंबित प्रश्नांचे काय???

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध राजकीय गट व नेतेमंडळींनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

error: Content is protected !!