Homeक्राईमब्रेकिंग न्यूज... माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या घरावर हल्ला; सांगोल्यात खळबळ,...

ब्रेकिंग न्यूज… माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या घरावर हल्ला; सांगोल्यात खळबळ, शेकापचा तीव्र निषेध व सांगोला बंदची हाक

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क…
सांगोला/प्रतिनिधी

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार (स्व.) भाई गणपतराव देशमुख यांच्या सांगोला येथील निवासस्थानी अज्ञातांनी बाटली फेकून हल्ला केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाने उद्या (शनिवार, ११ ऑक्टोबर) ‘सांगोला बंद’ची हाक दिली आहे.या घटनेनंतर शेकापच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार संतोष कणसे व सांगोला पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी काशीद यांना निवेदन देत हल्लेखोरांवर तातडीने कारवाई व अटक करण्याची मागणी केली आहे.

सुदैवाने कसला अनुचित प्रकार घडला नाही…
गणपतराव देशमुख यांच्या घरात सध्या त्यांचे नातू व विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख राहत असून, हल्ल्याच्या वेळी घरात काही सदस्य उपस्थित होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही शारीरिक हानी झाली नसली तरी, हा प्रकार अत्यंत गंभीर समजला जात आहे.

भाजप प्रवेश अन हल्ला..
विशेष म्हणजे, आजच सांगोल्यात शेकापचे काही माजी जिल्हा परिषद सदस्य व नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधीच हा हल्ला झाल्याने शहरात राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला वेगळेच गांभीर्य प्राप्त झाले आहे.शेकापने यावर तीव्र संताप व्यक्त करत सांगोला बंदची घोषणा केली असून, शहरात बंद पाळला जाणार आहे. दरम्यान, हल्ल्याच्या घटनेचा शहर व तालुक्यातील जनतेकडूनही तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

सांगोला बंदची हाक…
संपर्क साधताना: या घटनेमागे नेमका कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
🗓️ सांगोला बंद – शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५
🔍 मागणी – हल्लेखोरांवर तात्काळ अटक व कठोर कारवाई

(स्त्रोत दैनिक सकाळ)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर दादाभाई शेख यांचे दुर्दैवी निधन, खडकी गावासह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावाच्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारे, आपल्या शाहिरीच्या दमदार आवाजाने गेली तब्बल ४५ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खडकीचे नाव...

सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं…नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ; पालखीच्या भव्य मिरवणुकीत भाविकांचा उस्फूर्त...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी भक्तिमय...

शिरनांदगी गुरुकुल संस्थेत अकरावी प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन फॉर्म व संपूर्ण मार्गदर्शनाची सुविधा

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथील न्यू इंडियन गुरुकुल आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स ज्युनिअर कॉलेजतर्फे अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेशोत्सव...

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ फुटणार ?? पंढरपूर आणी मंगळवेढा असे दोन मतदारसंघ होणार,...

सोलापूर/ प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडवून आणणारी घडामोड पुढील काही काळात पाहायला मिळू शकते. तब्बल ४८ वर्षांनंतर राज्यातील मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया हाती...

error: Content is protected !!