Homeक्राईमकलाकेंद्रात गोळीबार!!सोलापूर जिल्ह्यातील कलाकेंद्रे बनताहेत गुंडांचा अड्डा, बार्शी तालुक्यातील सासुरे कला केंद्रासमोर...

कलाकेंद्रात गोळीबार!!सोलापूर जिल्ह्यातील कलाकेंद्रे बनताहेत गुंडांचा अड्डा, बार्शी तालुक्यातील सासुरे कला केंद्रासमोर बीडच्या उपसरपंचाच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर माढा तालुक्यातील कला केंद्रात गोळीबार..

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क:
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याच्या सासुरे कलाकेंद्रासमोर बीड जिल्ह्यातील एका उपसरपंचाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे गेल्या दोन दिवसात सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून मीडिया आणि सोशल मीडियात बराच काथ्याकुट होताना दिसतोय. आता हे प्रकरण ताजे असतानाच सोलापूर जिल्ह्यातीलच माढा तालुक्याच्या टेंभुर्णी गावाजवळ असलेल्या वेणेगाव हद्दीतील जय मल्हार लोकनाट्य कला केंद्रात नाच गाण्याची एकत्रित बैठक लावण्याच्या कारणावरून बुधवारी (दि. १०) मध्यरात्री दोन गटात झालेल्या वादातून एकावर गोळीबाराच्या घटनेत गोळी लागून दादा कोठावळे हा तरुण जखमी झाल्याचे प्रकरण घडले असल्याने पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यावरून सोलापूर जिल्ह्यातील कलाकेंद्र जणू गुंडांचा अड्डा बनताहेत अशा चर्चा सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू आहेत.

तीन आरोपी अटकेत एक फरार…
याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी सोन्या उर्फ अविष्कार किशोर शिंदे (२८, रा. कॉलेज समोर, पंढरपूर), अभिषेक दादासाहेब इंगळे (२९, रा. शेगाव दुमाला, हमु. रामबाग पंढरपूर), सूरज उर्फ अंबानी दत्तात्रय पवार (२३, रा. कोर्टी, ता. पंढरपूर) या तिघांना अटक केली. ज्ञानेश्वर उर्फ महाराज पांडुरंग कडलास्कर (रा. व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण पंढरपूर) हा आरोपी फरार आहे. चौघांपैकी गोळी कोणी झाडली व बंदूक कोठून आणली, याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. कला केंद्रात वादातून वाखरी (ता. पंढरपूर) येथील देवा बाळू कोठावळे (२७) याच्या पायावर गावठी बंदुकीतून गोळी झाडली होती. सर्व आरोपींची नावे समोर आली आहेत. यातील सूरज उर्फ अंबानी पवार, सोन्या उर्फ अविष्कार किशोर शिंदे, अभिषेक इंगळे या तिघांना अटक करून माढा न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यातील सूरजवर सहा गुन्हे असून तडीपारीची कारवाई झाली आहे. सोनू शिंदे याच्यावर २ गुन्हे आहेत. फरार कडलासकर याच्यावर ३ गुन्हे दाखल आहेत सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने भविष्यात पंढरपूर शहरात टोळीयुद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बीडच्या उपसरपंचाचा घातपात नसून ती आत्महत्याच…
बीड जिल्ह्यातील गोविंद बर्गे या उपसरपंचाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे प्रकरण घडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे. पण शवविच्छेदनानंतर ही आत्महत्या असल्याचा अहवाल सादर करण्यात आला असल्यामुळे बीडच्या उपसरपंचाची आत्महत्याच असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!