Homeराजकीयलागा तयारीला..जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर; आजपासून आचारसंहिता लागू

लागा तयारीला..जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर; आजपासून आचारसंहिता लागू

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क : राज्यातील १२ जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता असून, त्यानुसार आजपासून आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. जिल्हा परिषदांचे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत असल्याने या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी १६ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान असेल. दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी २२ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक २७ जानेवारी असून, त्याच दिवशी दुपारी साडेतीननंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हे नेमून दिली जातील. मतदान ५ फेब्रुवारी रोजी होणार असून, मतमोजणी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी केली जाणार आहे.

बारा जिल्हा परिषदांमध्ये होणार मतदान
या टप्प्यात लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदांच्या तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रशासनानेही निवडणूक प्रक्रियेच्या तयारीला सुरुवात केली आहे. आचारसंहिता लागू झाल्याने शासकीय यंत्रणा व राजकीय पक्षांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाचे नियंत्रण राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!