(टीम सोलापूर आजतक) सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे म्हणून सोलापूर जिल्ह्यातील लोहार समाजाच्या वतीने पैलवान आबासाहेब कळसाईत व दादासाहेब कळसा येथे यांच्या मार्गदर्शनाखाली नीरा नृसिंहपुर येथे दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. लोहार समाजासाठी आर्थिक महामंडळ व्हावे म्हणून आ. दत्तामामा भरणे यांनी शासन दरबारी मोठे प्रयत्न केले होते.
गत दोन महिन्यात खाली (टाकळी टें.) येथे झालेल्या भव्य लोहार समाज मेळाव्यात सहभागी झाल्यानंतर आमदार दत्तामामा भरणे यांनी समाजाला तुमच्यासाठी आर्थिक महामंडळ व्हावे म्हणून प्रयत्न करतो असा शब्द दिला होता. आणि अगदी महिनाभरात लोहार समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात आले.
याचीच उतराई म्हणून महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या वतीने आमदार दत्तामामा भरणे यांना कॅबिनेट मंत्री पद मिळावे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कडे मागणी केली जात आहे. तसेच ठिकठिकाणी आराध्य दैवतांना दुग्धाभिषेक घालण्यात येत आहे.
**************
नीरा नृसिंहपुर या ठिकाणी लोहार समाजाच्या वतीने दत्तामामा भरणे यांना मंत्री मंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणन वर्णी लागावी यासाठी दुग्ध अभिषेक करण्यात आला गेल्या दोन महिन्यांमध्ये भरणे मामा यांच्यामुळे लोहार समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळण्यासाठी मामांनी प्रयत्न केले होते व त्या प्रयत्नाला यश आले. त्यामुळे आज आम्ही लोहार समाजाच्या वतीने मामांची मंत्री म्हणून वर्णी लागावी व राहिलेला लोहार समाजाचा ज्या मागणी आहेत ते मामांच्या हातून पूर्ण व्हाव्या यासाठी आम्ही आज दुग्ध अभिषेक घालून देवाला साकडे घातलेला आहे.
दादासाहेब कळसाईत
प्रदेशाध्यक्ष, विश्वकर्मा लोहार विकास संस्था महाराष्ट्र राज्य
