Homeआरोग्यमंगळवेढा येथे बेलदार हॉस्पिटलचे ४ जानेवारीला भव्य उद्घाटन, डॉ. सचिन बेलदार यांची...

मंगळवेढा येथे बेलदार हॉस्पिटलचे ४ जानेवारीला भव्य उद्घाटन, डॉ. सचिन बेलदार यांची माहिती

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी : मंगळवेढा शहरातील आरोग्यसेवेत महत्त्वाची भर घालणाऱ्या बेलदार हॉस्पिटल, आय.सी.यू. अ‍ॅन्ड पेडियाट्रिक क्रिटिकल केअर तसेच राधाई मेडिकल स्टोअर्स यांचा भव्य उद्घाटन समारंभ रविवार, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीराम मार्टजवळ, शिशुविहार समोर मंगळवेढा येथे होणार आहे. या उद्घाटन समारंभाचे शुभहस्ते आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रशांतराव परिचारक असणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजय देशमुख (रेडिओलॉजिस्ट व डायरेक्टर, लाईफ लाईन हॉस्पिटल, पंढरपूर) उपस्थित राहणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ. सचिन बेलदार यांनी दिली.

विविध क्षेत्रातील मान्यवरांची असणार उपस्थिती
या सोहळ्यास मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे, पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी विरोधी पक्ष नेते अजित जगताप, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, धनश्री परिवाराचे संस्थापक शिवाजीराव काळुंगे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हॉइसचे चेअरमन तानाजी खरात, दामाजी नगरचे सरपंच जमीर सुतार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग चौगुले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभणार असून त्यामध्ये बालरोगतज्ञ डॉ. शितल शहा, डॉ. नीरज शहा, डॉ. कुलदीप कोलपाकवर, डॉ. प्रवीण वायकुळे, डॉ. अशोक सुरवसे, मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचराज जानकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब जानकर, डॉ. मधुकर कुंभारे, डॉ. सुभाष देशमुख, डॉ. शाकीर सय्यद, डॉ. सचिन बनसोडे व डॉ. शेखर नेने यांचा समावेश आहे.

अत्याधुनिक सोई सुविधा
नवीन सुरू होणाऱ्या बेलदार हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आय.सी.यू. सुविधा तसेच बालरोगांसाठी स्वतंत्र क्रिटिकल केअर युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे गंभीर आजारग्रस्त रुग्ण व लहान बालकांसाठी मंगळवेढा व परिसरातील नागरिकांना दर्जेदार व तात्काळ उपचारांची सुविधा मिळणार आहे. याच ठिकाणी सुरू होत असलेल्या राधाई मेडिकल स्टोअर्समुळे आवश्यक औषधे एकाच छताखाली सहज उपलब्ध होणार असून, रुग्ण व नातेवाइकांची गैरसोय टळणार आहे. या भव्य उद्घाटन समारंभास मंगळवेढा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाऊसाहेब बेलदार, खडकीचे माजी सरपंच रघुनाथ बेलदार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पंढरपूरच्या सांस्कृतिक वारशासोबत औद्योगिक विकासाचीही गरज; शिवसेना नेते अनिल सावंत यांची उद्योगमंत्री ना. उदय...

पंढरपूर / प्रतिनिधी : आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या पंढरपूर शहराला आता मराठी भाषा संवर्धनासोबतच औद्योगिक विकासाचीही जोड मिळावी, अशी मागणी पुढे येऊ...

यशाच्या शिखरावर असताना इतके टोकाचे पाऊल का उचलले?पोलिसांकडून रिलस्टार रोहिणी पाराधे यांच्या आत्महत्येची सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इंस्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून अल्पावधीतच...

फायटर स्पोर्ट्स क्लब नंदेश्वर यांच्या वतीने PSI रकमाजी पडवळे यांचा सत्कार संपन्न

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या शिरणांदगी येथील रकमाजी जकु पडवळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक विभागीय...

मंगळवेढा तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सत्कार

नंदेश्वर / प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी मंगळवेढा भाजप युवा मोर्चाकडून उत्साहपूर्ण तयारी करण्यात आली. मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथ...

सलग दुसऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत सासणे याने मिळविले उत्तुंग यश, सर्व स्तरातून अभिनंदन व...

नंदेश्वर / प्रतिनिधी : एन.एम.एम.एस. या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग असे यश मिळवित शिष्यवृत्तीस पात्र ठरल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या उच्च...

error: Content is protected !!