Homeसामाजिकपाठपुरावा..नंदेश्वरसह आठ गावांची आर्थिक नाडी असणारी जिल्हा मध्यवर्ती बँक पुन्हा सुरू होणार.....

पाठपुरावा..नंदेश्वरसह आठ गावांची आर्थिक नाडी असणारी जिल्हा मध्यवर्ती बँक पुन्हा सुरू होणार.. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी कुंदन भोळे यांची माहिती.. आ.समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश डांगे यांचा पाठपुरावा.

(टीम सोलापूर आजतक)
नंदेश्वरसह जुनोनी, खडकी, गोणेवाडी, शिरशी, खुपसंगी, सिद्धनकेरी, जालीहाळ या आठ गावांचे आर्थिक नाडी असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नंदेश्वर शाखा पुन्हा नव्याने सुरू होण्याच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासकीय अधिकारी कुंदन भोळे यांनी तसेच संकेत दिले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक समितीचे माजी सदस्य आकाश डांगे यांनी दिली आहे. आमदार समाधान आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली आकाश डांगे यांनी कुंदन भोळे यांची भेट घेत त्यांचे सोबत चर्चा केली आणि आमदार समाधान आवताडे यांचे शिफारस पत्र दिले.

आमदार समाधान आवताडे यांनी दिलेल्या शिफारस पत्रात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील मौजे नंदेश्वर या गावात असलेली आपल्या बँकेची शाखा ही प्रशासकीय कारणास्तव भोसे ता. मंगळवेढा येथे वर्ग करण्यात आलेली आहे. नंदेश्वर या गावची लोकसंख्या व व्यापार, शेती तसेच शासकीय अनुदान तसेच महिलांना व नागरीकांना विविध योजनांच्या आर्थिक व्यवहारासाठी भोसे येथे जावे लागते. त्यामुळे त्या नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तेथील नागरीकांनी सदरची वर्ग केलेली शाखा पुन्हा नंदेश्वर येथे चालू करण्यासाठी मागणी केली आहे त्याप्रमाणे कार्यवाही होणे गरजेचे आहे. तरी आपल्या नियमाप्रमाणे व नंदेश्वर येथील नागरीकांनी दिलेल्या अर्जाप्रमाणे सदरची वर्ग केलेली शाखा पुन्हा नंदेश्वर येथे चालू करण्यासाठी शिफारस करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

नंदेश्वरची शाखा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न…
या संदर्भात कुंदन भोळे यांनी आ.समाधान आवताडे यांनी पाठपुरावा केलेल्या नंदेश्वर येथील शाखेबाबत व अक्कलकोटचे आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या दुधनी या गावातील शाखे संदर्भात प्रस्ताव तयार केलेल आहेत. ते प्रस्ताव रिझर्व बँक यांच्याकडे परवानगीसाठी पाठवलेले आहेत अशी माहिती दिली या संदर्भात कायदेशीर बाबी तपासून व जिल्हा बँक अडचणीत असल्याकारणाने रिझर्व बँक कुठल्याही नवीन शाखेला परमिशन देत नाही परंतु मार्च एंडिंगला बँकेच्या एनपीए 3 टक्केच्या आत मध्ये आल्यानंतर मार्चनंतर ही बँक नंदेश्वरसाठी आपण चालू करू अशा प्रकारच आश्वासन दिले असल्याची माहिती आकाश डांगे यांनी यावेळी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!