Homeराजकीयसांगोल्यात संतापाचा भडका, डॉ.अनिकेत देशमुख यांची आक्रमक सिंहगर्जना, मी स्व.गणपत आबांसारखा आणि...

सांगोल्यात संतापाचा भडका, डॉ.अनिकेत देशमुख यांची आक्रमक सिंहगर्जना, मी स्व.गणपत आबांसारखा आणि आ.बाबासाहेब देशमुखांसारखा मवाळ नाही, हिंमत असेल तर उघड विरोध करा

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क…
सांगोला/तालुका प्रतिनिधी: सांगोल्यातील राजकीय वातावरण तापले असून, शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत सांगोल्यात जोरदार गर्जना केली. मी स्व.गणपतआबा देशमुख आणि विद्यमान आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासारखा मवाळ नाही. ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी उघडपणे विरोध करावा. आम्ही कुणाच्याही दबावाला घाबरणार नाही,” असा तीव्र इशारा त्यांनी दिला.

सांगोला कडकडीत बंद..
शुक्रवारी माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांच्या घरावर समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात बंदचे आवाहन करण्यात आले होते. शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सांगोला शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदनंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना डॉ. अनिकेत देशमुख यांनी आपली ठाम भूमिका मांडली.

जशास तसे उत्तर मिळेल…
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “स्व. गणपतराव देशमुख यांचे संयमी राजकारण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांच्यानंतर चंद्रकांतदादा देशमुख आणि विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हेही शांत आणि संयमी स्वभावाचे आहेत. मात्र, आमच्या संयमाची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आम्ही संयम ठेवतो म्हणजे आम्ही कमजोर आहोत असे समजू नका. जर आमच्या घरावर, आमच्या माणसांवर हात उगारला गेला, तर उत्तर देखील जशास तसे मिळेल. आम्ही कोण आहोत हे दाखवून देण्यासाठी फार वेळ लागणार नाही.

कार्यकर्त्यांनो निश्चिंत रहा..
शेवटी, त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “शेतकरी कामगार पक्ष आणि आमच्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने यापुढे निश्चिंत राहावे. कारण मी स्व.गणपतआबा आणि आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यासारख्या संयमी, मवाळ नाही. ज्यांना आम्हाला विरोध करायचा आहे त्यांनी आम्हाला उघड विरोध करावा त्यावेळी आम्ही दाखवून देऊ आम्ही काय आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!