Homeराजकीयशिंदेसेनेने केले भाजपला ओव्हरटेक...सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना अव्वल; सहा नगरपालिकांवर वर्चस्वाची...

शिंदेसेनेने केले भाजपला ओव्हरटेक…सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना अव्वल; सहा नगरपालिकांवर वर्चस्वाची चर्चा

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क
सोलापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे बळ सातत्याने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. सांगोला, मैंदर्गी आणि मोहोळ या तीन नगरपालिका थेट धनुष्यबाण चिन्हावर निवडून आल्याने शिंदे गटाची ताकद स्पष्ट झाली आहे. याशिवाय, तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवून जिंकलेल्या पंढरपूर आणि मंगळवेढा नगरपालिकांवरही शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी दावा केला आहे.

पंढरपूर, मंगळवेढावर शिंदे गटाचा दावा
पंढरपूर नगरपालिकेत सत्ता मिळवलेले भगीरथ भालके तसेच मंगळवेढा नगरपालिकेत सत्ताधारी असलेले बबनराव आवताडे आणि सिद्धेश्वर आवताडे यांच्याबाबत शिंदे गटाशी जवळीक असल्याच्या चर्चा असून, यावर त्यांनी आजपर्यंत कोणताही जाहीर नकार दिलेला नाही. विशेष म्हणजे, नगरपालिका निवडणुकीपूर्वी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महापूजेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असताना भगीरथ भालके तसेच बबनराव आवताडे व सिद्धेश्वर आवताडे यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला होता. तेव्हापासून हे नेते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरू आहेत.

करमाळा नगरपालिकेत जायंट किलर ठरलेले सुनीलबापू सावंत यांनी स्वीकारला आ.तानाजी सावंत यांचा सत्कार
दरम्यान, करमाळा नगरपालिकेत अपक्ष पॅनलच्या माध्यमातून विजय मिळवित जायंट किलर ठरलेले पॅनलप्रमुख सुनीलबापू सावंत यांनी नुकतीच माजी आरोग्यमंत्री आ.तानाजी सावंत यांची भेट घेऊन सत्कार स्वीकारला. या भेटीनंतर करमाळा नगरपालिकेचे सत्ताधिकारीही शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

एकूण सहा नगरपालिकांवर शिंदे गटाचे वर्चस्व???
सध्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या सांगोला, मैंदर्गी आणि मोहोळ या तीन नगरपालिका, त्यासोबत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा दावा असलेली पंढरपूर व मंगळवेढा आणि चर्चेत असलेली करमाळा नगरपालिका अशा एकूण सहा नगरपालिकांवर जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित झाले, तर सोलापूर जिल्ह्यात शिंदे गटाची शिवसेना अव्वल ठरेल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!