नंदेश्वर /प्रतिनिधी – खडकी (ता. मंगळवेढा) येथील गुरुदत्त आध्यात्मिक आश्रम खडकी मठात श्री दत्त जयंती उत्सव गुरुचरित्र अनुष्ठान सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गुरुदत्त अध्यात्मिक आश्रम खडकी मठाचे व्यवस्थापक गणेश राठोड यांनी दिली आहे.
शनिवार दिनांक १४ ते बुधवार दिनांक 18 या पाच दिवसांच्या काळात गुरुचरित्र अनुष्ठान सोहळा संपन्न होणार आहे. शनिवार दिनांक 14 रोजी यशवंत खताळ महाराज यांचे शुभ हस्ते ध्वज पूजन कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.
यानंतर रविवार दिनांक 15 सोमवार दिनांक 16 मंगळवार दिनांक 17 या तीन दिवसांच्या काळात किर्तन प्रवचन हरिजागर भजन असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. मंगळवार दिनांक 17 रोजी रात्री कीर्तनकारांची कीर्तन सेवा होऊन हरिजागर झाला.
बुधवार दि. 18 रोजी ज्ञानेश्वर दादा चोपडे यांचे हस्ते सकाळी दासबोध गुरुचरित्र पादुका पूजन होईल. यानंतर अनुष्ठान सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व संत महात्मे यांची कीर्तन, प्रवचन सेवा होऊन मठाधिपती सुदर्शन महाराज खडकीकर यांचे विमल ब्रह्मनिरूपण कीर्तन होऊन दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी होईल.
स.स.प्रभूदेव महाराज हिप्परगी इंचगिरी मठ, सं.स.आनंद काडसिद्धेश्वर महाराज कोल्हापूर हे उपस्थित राहून भाविक भक्तांना प्रवचनरूपी मार्गदर्शन करणार आहेत.
अनुष्ठान सोहळा काळात महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यातील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे
