Homeताज्या बातम्याआदर्शवत उपक्रम....नंदेश्वर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

आदर्शवत उपक्रम….नंदेश्वर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवणे समाजासाठी अतिघातक – गुरुलिंग दोलतडे

नंदेश्वर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदेश्वर /प्रतिनिधी

आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित गोण्या गोविंदाने राहिल्यानेच जगभर आपली भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ मानली जाते. पण अलीकडच्या काळात प्रत्येक जण जाती धर्माच्या पलीकडे जाण्यास तयार नाही. इतकेच नाहीतर आपल्या देशाच्या राज्याच्या जडणघडणीत ज्या महापुरुषांनी आपले बहुमोल योगदान दिले त्या महापुरुषांना देखील आग जातीच्या बंधनात अडकवले जात आहे. महापुरुषांच्या जयंती देखील त्या त्या जातीच्या लोकांनीच करायच्या असा प्रकार सध्या पाहायला मिळत आहे. मुळात महापुरुषांचे विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहोचू नयेत या मुख्य कारणासाठीच उच्चवर्णीयांनी हा घाट घातला आहे. त्यामुळे महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवणे समाजासाठी अत्यंत घातक ठरत असल्याचे प्रतिपादन श्री बाळकृष्ण माऊली सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुलिंग दोलतडे यांनी केले.

नंदेश्वर तालुका मंगळवेढा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद केंद्र शाळा नंदेश्वर येथील विद्यार्थ्यांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ नंदेश्वर यांच्या वतीने शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी गुरुलिंग दोलतडे बोलत होते.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब सासणे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विश्वास कांबळे, जयसिंग कांबळे, संतोष कांबळे, भागवत कांबळे, मनसेचे रावसाहेब लोहार, बाळासाहेब मासाळ, सुशेन क्षिरसागर,बाळासाहेब मोरे यांचेसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना अशोक मासाळ म्हणाले की, भारत देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ब्रिटिशांकडून उच्चवर्णीयांकडे झालेले सत्तांतर आहे. जोपर्यंत इथल्या सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भारत देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही अशा प्रकारचे बंडखोर विचार त्याकाळी आण्णाभाऊ साठे यांनी मांडण्याचे धारिष्ट दाखवले. इतकेच नाही तर सर्वसामान्यांसाठी तसेच कामगारांसाठी मोठी चळवळ तसेच लढा त्यांनी उभा करण्यासाठी त्यांनी त्याकाळी वीस हजार लोकांचा मोर्चा काढला होता. एवढे मोठे कार्य असणारे आणी फक्त दीड दिवस शाळेला गेलेले आण्णाभाऊ साठे यांनी लिहून ठेवलेले कादंबरी,पोवाडे,कवण अत्यंत थक्क करणारे आहे.
यावेळी अंकुश नारायण कांबळे, तानाजी कांबळे, रशीद कांबळे सर्जेराव कांबळे बाळू कांबळे लक्ष्मणरावदिवे अनिल कांबळे संजय कांबळे बच्चन रणदिवे, भिकाजी कांबळे, मल्हारी कांबळे, दया कांबळे, हनुमंत तोराप्पा कांबळे, दिनकर रणदिवे, हनुमंत बजरंग कांबळे, रतिलाल कांबळे, बसवंत कांबळे, लक्ष्मण कांबळे, सत्यवान कांबळे, आकाश कांबळे, रघुनाथ कांबळे, बाळासाहेब कांबळे, समाधान कांबळे, विक्रम कांबळे, दुर्योधन कांबळे, राहुल कांबळे, रतिलाल कांबळे, सचिन कांबळे, नाथा कांबळे, राहुल कांबळे, सचिन नाना कांबळे, तानाजी भानुदास कांबळे, गैबी कांबळे, बापू कांबळे, दत्ता वाघमारे, सर्जेराव खुडे, सुनील कांबळे, विजय कांबळे यांचेसह लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!