Homeसामाजिकशाहिरी जलसा,भव्य दिव्य मिरवणूक आणि शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून जपलेली...

शाहिरी जलसा,भव्य दिव्य मिरवणूक आणि शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून जपलेली सामाजिक बांधिलकी आदी उपक्रमांनी नंदेश्वर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

नंदेश्वर /प्रतिनिधी
नंदेश्वर ता.मंगळवेढा येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आल्याची माहिती लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विश्वास कांबळे, उपाध्यक्ष लक्ष्मण नारायण कांबळे यांनी दिली. शनिवार दिनांक १६ रोजी सकाळी ठीक १० वा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व तसेच इतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्याचा आले. नंदेश्वरचे माजी सरपंच गेणा दोलतडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

यानंतर दुपारी ठीक बारा वाजता सुप्रसिद्ध शाहीर जयवंत रणदिवे यांचा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित शाहिरी जलसा हा कार्यक्रम संपन्न झाला. शाहिरी जलसा या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सायंकाळी ठीक पाच वाजता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक निघाली. या मिरवणुकीचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर आणि माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक समितीचे माजी सदस्य आकाश डांगे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विश्वास कांबळे, माजी उपसरपंच अंकुश कांबळे, युवक नेते जयसिंग कांबळे, संतोष कांबळे, सोन्या घोड्याचे मालक लक्ष्मण कांबळे घोडेवाले, भागवत कांबळे, हे उपस्थित होते.

अत्यंत नेटके नियोजन आणि दर्जेदार उपक्रमांनी यावर्षीचा अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव सोहळा पार पडला अशा प्रतिक्रिया नंदेश्वर गावातून उमटताना दिसत आहेत. बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.बापुसाहेब मेटकरी यांनी नंदेश्वर येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात भेट दिली. यावेळी जयंती उत्सव मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी युवक नेते रशीद कांबळे, तानाजी कांबळे, सर्जेराव कांबळे, बाळू कांबळे, लक्ष्मण रणदिवे, अनिल कांबळे, संजय कांबळे, बच्चन रणदिवे, भिकाजी कांबळे, मल्हारी कांबळे, दया कांबळे, हनुमंत तोराप्पा कांबळे, दिनकर रणदिवे, हनुमंत बजरंग कांबळे, रतिलाल कांबळे, बसवंत कांबळे, लक्ष्मण कांबळे, सत्यवान कांबळे, आकाश कांबळे यांचेसह

रघुनाथ कांबळे, बाळासाहेब कांबळे, समाधान कांबळे, विक्रम कांबळे, दुर्योधन कांबळे, राहुल कांबळे, रतिलाल कांबळे, सचिन कांबळे, नाथा कांबळे, राहुल कांबळे, सचिन नाना कांबळे, तानाजी भानुदास कांबळे, गैबी कांबळे, बापू कांबळे, दत्ता वाघमारे, सर्जेराव खुडे, सुनील कांबळे, विजय कांबळे यांचेसह लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!