Homeताज्या बातम्यादणका आंदोलनाचा...बाणेगाव ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची होणार चौकशी, बाणेगावच्या ग्रामपंचायत सदस्या कीर्ती चाफाकरंडे यांच्या...

दणका आंदोलनाचा…बाणेगाव ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची होणार चौकशी, बाणेगावच्या ग्रामपंचायत सदस्या कीर्ती चाफाकरंडे यांच्या आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल…एक महिन्याचा अल्टीमेटम…

(टीम सोलापूर आजतक)
बाणेगाव (ता.उ.सोलापूर) येथील ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्या कीर्ती चाफाकरंडे व सचिन चाफाकरंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देत स्वातंत्र्यदिनी उपोषण केले. या उपोषणाची उत्तर सोलापूर पंचायत समितीने गांभीर्याने दखल घेत बाणेगाव ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे पत्र दिले आहे.

पंचायत समितीच्या वतीने दिलेल्या पत्रात ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत चौकशी करुन अहवाल सादर करण्याबाबत संदर्भ क्रमांक ०२ नुसार कळविण्यात आलेले आहे, तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा बाबत आपल्या तक्रारीनुसार उचित कार्यवाही करण्यासाठी उपअभियंता (ग्रा.पा.पु.), उत्तर सोलापूर यांना कळविण्यात आलेले आहे, सदर बाबत आपल्या तक्रारीची दखल घेऊन पंचायत समिती स्तरावरुन प्राथमिक उचित कार्यवाही सुरू केलेली आहे असे नमूद करण्यात आले आहे.

या पत्रामुळे उपोषणकर्ते कीर्ती चाफाकरंडे आणि सचिन चाफाकरंडे यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. तसेच एक प्रशासनाने दिलेल्या पत्रानुसार एक महिन्याच्या आत कार्यवाही नाही झाली तर पुन्हा उत्तर सोलापूर पंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केले जाईल असा इशारा दिला आहे.

बाणेगाव ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे आणि या भ्रष्टाचाराला वाचाल फुटावी म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी अमरण उपोषण सुरू केले. पण उत्तर सोलापूर पंचायत समिती कडून योग्य ती कार्यवाही असे पत्र मिळाल्यानंतर आम्ही आमचे आंदोलन तात्पुरते स्थगित करीत आहोत. एक महिन्याच्या आत कार्यवाही पूर्ण नाही झाली तर पुन्हा उत्तर सोलापूर पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करू.
कीर्ती चाफाकरंडे
ग्रामपंचायत सदस्या बाणेगाव (ता.उ.सोलापूर)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!