Homeक्राईमखळबळजनक!! अभियंत्याचा मृतदेह सापडला नदीच्या पात्रात, राजकीय दबावातून आत्महत्या केल्याचा मृताच्या नातेवाईकांचा...

खळबळजनक!! अभियंत्याचा मृतदेह सापडला नदीच्या पात्रात, राजकीय दबावातून आत्महत्या केल्याचा मृताच्या नातेवाईकांचा दावा…

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क:
पंचायत समितीतील बांधकाम विभागाकडील शाखा अभियंत्याने कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. सांगलीतील बायपास पुलाजवळ नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. अवधूत अशोक वडार (वय २७, रा. इस्लामपूर) असे मृताचे नाव आहे. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणीत समोर आले आहे.

राजकीय दबावापोटी आत्महत्या…
दरम्यान, वडार यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात दाखल होत, राजकीय दबावातून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे शासकीय रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.

इस्लामपूर येथील अवधूत वडार गेल्या सहा-सात वर्षांपासून जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागामध्ये शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते. नातेवाईकांच्या सतत कामाच्या तणावात होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तसेच राजकीय दबाव असल्याचे ते सांगत होते, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. शुक्रवारी ते जत येथून निघाले. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत घराकडे परतले नाहीत. यामुळे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते.

पाण्यावर तरंगत होता मृतदेह…
अवधूत वडार म्हणण्यानुसार सहा महिन्यांपासून ते
दरम्यान, शुक्रवारी सकाळी सांगलीतील बायपास रस्त्यावरील पुलाखाली एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आले. स्पेशल रेस्क्यूच्या जवानांनी नदीपात्रात पुलाखाली उतरून मृतदेह बाहेर काढला.पोलिसांच्या चौकशीत हा मृतदेह जत पंचायत समितीकडे कार्यरत अवधूत वडार यांचा असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे वडार यांच्या इस्लामपूर व जत येथील नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. सांगली शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!