Homeसामाजिकनंदेश्वर येथे धनश्री महिला पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन, मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन संपन्न

नंदेश्वर येथे धनश्री महिला पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन, मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन संपन्न

सोलापूर आजतक न्यूज नेटवर्क
नंदेश्वर येथील धनश्री महिला पतसंस्था शाखेत संस्थेच्या नव्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात पार पडले. या दिनदर्शिकेचे प्रकाशन धनश्री मल्टीस्टेटचे संचालक रामभाऊ बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धनश्री महिला पतसंस्था नंदेश्वर शाखेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर फटे हे प्रमुख उपस्थित होते.

दिनदर्शिकेच्या माध्यमातून संस्थेचे मूल्ये उपक्रम आणि मार्गदर्शक माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते – रामभाऊ बंडगर
कार्यक्रमात बोलताना रामभाऊ बंडगर यांनी धनश्री महिला पतसंस्थेच्या सामाजिक व आर्थिक योगदानाचा आढावा घेतला. धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा. शिवाजीराव काळुंगे आणि धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन शोभा काळुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत असून, दिनदर्शिकेमधून संस्थेची मूल्ये, उपक्रम आणि मार्गदर्शक माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, असे त्यांनी नमूद केले.

मान्यवरांची उपस्थिती
व्यवस्थापक ज्ञानेश्वर फटे यांनी शाखेच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले व नंदेश्वर परिसरात संस्थेच्या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी रामभाऊ कोपे, शिवसेना महिला आघाडीच्या माजी तालुकाप्रमुख सुशीला सलगर, संजय भोसले, संतोष बंडगर, विक्रम कांबळे यांचेसह ज्योतीराम सावंत,सोमनाथ लवटे, भाग्यश्री लाड, सुजाता मेटकरी, मनीषा भोसले यांचेसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

काँग्रेस सेवा दलाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी बजरंग चौगुले

नंदेश्वर/ प्रतिनिधी : काँग्रेस सेवा दलाच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी बजरंग चौगुले यांची निवड करण्यात आली आहे. बजरंग चौगुले यांनी यापूर्वी मंगळवेढा काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष...

काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी संदीप पवार

नंदेश्वर / प्रतिनिधी : तालुका काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप पवार यांची निवड करण्यात आली असून, या निवडीमुळे पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक बळकटीला नवे...

माझ्या पदाचा वापर शेतकऱ्यांच्या कल्याणसाठीच करीन..कृषी उपसंचालक सोनाली दोलतडे यांचा नंदेश्वरमध्ये जंगी सत्कार, गावातून...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावची भूमिपुत्री सोनाली जगन्नाथ दोलतडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत कृषी उपसंचालक...

जिल्हास्तरीय शिक्षण भूषण पुरस्काराने बंडू गडदे यांना करण्यात आले सन्मानित, सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री स्मिता...

नंदेश्वर / प्रतिनिधी : शिरनांदगी येथील विविध शैक्षणिक संस्थांचे संस्थापक आणि भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी बंडू शंकर गडदे यांना जिल्हास्तरीय “शिक्षण भूषण” पुरस्काराने गौरविण्यात...

खडकी येथील घोडके कुटुंबीयांना भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांचा आधार, आर्थिक मदत करत...

नंदेश्वर / प्रतिनिधी : खडकी (ता. मंगळवेढा) परिसरात नुकत्याच घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. सरपण आणण्यासाठी गेलेल्या आईसह तिच्या दोन...

error: Content is protected !!