Homeराजकीयदामाजी सलगर भोसे पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या पंजावर लढणार

दामाजी सलगर भोसे पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या पंजावर लढणार

नंदेश्वर | प्रतिनिधी : भोसे पंचायत समिती गणातून निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून दामाजी सलगर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नंदेश्वर येथील श्री विश्वमाऊली दूध संकलन केंद्राचे चेअरमन म्हणून त्यांनी शेतकरी हितासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांची संपूर्ण परिसरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. दामाजी सलगर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून नंदेश्वर तसेच आजूबाजूच्या गावांतील शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य आणि स्थिर दर मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. दूध संकलन, दरवाढीसाठी पाठपुरावा, तसेच शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट मिळावे यासाठी त्यांनी प्रभावी व्यवस्थापन उभे केले. यामुळे शेतकरी वर्गात त्यांच्याबद्दल विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे.

स्वबळावर निवडणुका लढविण्याचा अनुभव
युवकांमध्येही दामाजी सलगर यांची विशेष क्रेझ पाहायला मिळते. सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे ते एक अभ्यासू, संपर्कशील आणि काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. याआधी त्यांनी नंदेश्वर ग्रामपंचायतीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांनी उल्लेखनीय मते मिळवत आपली स्वतंत्र ताकद सिद्ध केली होती. त्यांचा तो अनुभव आणि जनसंपर्क लक्षात घेता, यावेळी काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली आहे.

दामाजी सलगर यांच्या नावावर एकमत
काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी दामाजी सलगर यांच्या नावावर एकमत दर्शवत, भोसे पंचायत समिती गणात पक्षाला बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नंदेश्वर व परिसरातील समर्थकांनी आनंद व्यक्त केला असून, गावागावात प्रचाराची तयारी सुरू झाली आहे. शेतकरी हित, युवकांचे प्रश्न, पाणी, रस्ते व मूलभूत सुविधा यांना प्राधान्य देणार असल्याचे दामाजी सलगर यांनी सांगितले. “सामान्य शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांसाठी मी नेहमीच मैदानात राहीन,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीत दामाजी सलगर यांची लढत भोसे पंचायत समिती गणात रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत असून, काँग्रेसच्या पंजाला किती बळ मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगतची धोकादायक विहीर बुजविण्यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने बोलाविली विशेष ग्रामसभा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न...

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगत आणि नंदेश्वर गावाच्या हद्दीत असलेली धोकादायक विहीर तातडीने बुजविण्याच्या मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने विशेष...

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसाय समाविष्ट करा, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप...

नंदेश्वर | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर धोरणात मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसायाचा समावेश करावा, अशी मागणी...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नंदेश्वर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्रलंबित प्रश्नांचे काय???

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध राजकीय गट व नेतेमंडळींनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

error: Content is protected !!