Homeताज्या बातम्यामंगळवेढ्यात मध्यरात्री भीषण आग : श्री जिजामाता कृषी केंद्र जळून खाक, माजी...

मंगळवेढ्यात मध्यरात्री भीषण आग : श्री जिजामाता कृषी केंद्र जळून खाक, माजी सभापती प्रदीप खांडेकर यांच्या नामांकित कृषी दुकानाचे लाखोंचे नुकसान

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा शहरात गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले. पंचायत समितीचे माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या मालकीच्या सुप्रसिद्ध “श्री जिजामाता कृषी केंद्र” या कृषी सेवा केंद्राला मध्यरात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण दुकानाला वेढा घातला आणि दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा दुकानातून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुकानामध्ये कृषी औषधे, रासायनिक खते, बियाणे तसेच ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आग अतिशय वेगाने पसरली आणि काही वेळातच संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक कर्मचाऱ्यांनी रात्रभर अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पहाटेपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. स्थानिक नागरिकांनीही पाण्याची व्यवस्था करून तसेच बचावकार्यामध्ये मदत करून प्रशासनाला सहकार्य केले.

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने समाधान व्यक्त केले जात असले, तरी आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसल्याची भावना व्यक्त होत आहे. दुकानातील कृषी औषधे, बियाणे, संगणकीय साहित्य, फर्निचर तसेच इतर महत्त्वाचे साहित्य पूर्णपणे जळून गेले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी प्रशासनाकडून सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिस आणि संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करत आहेत.घटनेनंतर शहरातील व्यापारी आणि शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. “श्री जिजामाता कृषी केंद्र” हे परिसरातील शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह कृषी सेवा केंद्र म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे या घटनेमुळे अनेक शेतकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली.

दरम्यान, अनेक मान्यवरांनी घटनास्थळी भेट देत प्रदीप खांडेकर यांना धीर दिला. मंगळवेढा शहरात अल्पावधीत घडलेल्या दुसऱ्या मोठ्या दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने शहरातील व्यापारी आस्थापनांची सुरक्षा तपासणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण तापले, सोशल मीडियावर झळकू लागले भावी सरपंच,...

नंदेश्वर | प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात येत्या दोन ते तीन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता असून, त्याच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच...

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा बंद होण्याच्या मार्गावर

सोलापूर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महत्त्वाची ठरलेली सोलापूर जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेची टोलफ्री सेवा निधीअभावी...

error: Content is protected !!