Homeशिक्षण-प्रशिक्षणकौतुकास्पद...प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने मसनेरवस्ती शाळेत स्पोर्ट्स किटचे वाटप, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे...

कौतुकास्पद…प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने मसनेरवस्ती शाळेत स्पोर्ट्स किटचे वाटप, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याची भेट

नंदेश्वर / प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रेरणा उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसनेरवस्ती येथील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. प्रेरणा स्पोर्ट गारमेंटचे मालक बाळासाहेब सलगर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांच्या शारीरिक व क्रीडा कौशल्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

विद्यार्थ्यांना विविध खेळांचा सराव करण्यासाठी होणार उपयोग
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. क्रीडा साहित्यामुळे विद्यार्थ्यांना विविध खेळांचा सराव करण्यास तसेच त्यांच्या क्रीडा कौशल्यांना वाव मिळण्यास मदत होणार आहे. समाजातील विविध घटकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास दत्तात्रय बिरा सलगर, दिलीप नाना गरंडे, घोरसडे सर, कोकणे सर, तुकाराम दोलतडे, भगवान गरंडे, , शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिपालीताई दिलीप गरंडे, उपाध्यक्ष बिरुदेव दोलतडे, माणिक गरंडे, तानाजी गरंडे, सुनील गरंडे, मा. बळक्षेत्री काका, ज्ञानेश्वर गरंडे, इंदाबाई मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
स्पोर्ट्स किट मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. शाळेतील शिक्षक, शालेय शिक्षण समिती तसेच पालकांनी प्रेरणा उद्योग समूह, मेजर दत्ता सलगर, बाळासाहेब सलगर यांचे आभार मानत या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले.विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वखर्चातून तब्बल दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती; नंदेश्वर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बापूसाहेब गरंडे यांच्या...

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर ते वाणीचिंचाळे दरम्यानचा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत होता. या रस्त्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच परिसरातील...

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

error: Content is protected !!