Homeक्राईमब्रेकिंग न्यूज... रक्षाबंधनासाठी मित्राच्या बहिणीला आणायला निघाला; परतीच्या वाटेवर काळाने हिरावला मित्राचा...

ब्रेकिंग न्यूज… रक्षाबंधनासाठी मित्राच्या बहिणीला आणायला निघाला; परतीच्या वाटेवर काळाने हिरावला मित्राचा जीव; गोणेवाडीवर शोककळा, भाऊ-बहीण गंभीर जखमी

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी
रक्षाबंधनाच्या सणासाठी बहिणीला माहेरी आणण्याचा आनंद घेऊन निघालेल्या भावाच्या वाट्याला नियतीने मात्र काळीज पिळवटून टाकणारे दुःख दिले. मित्राच्या बहिणीला घरी आणण्यासाठी मंगळवेढ्याला गेलेल्या तरुणाचा परतीच्या प्रवासात झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला भाऊ आणि त्याची बहीण गंभीर जखमी झाले. मित्राच्या बहिणीला घरी पोहोचविण्यासाठी मदतीचा हात देणाऱ्या महादेव परमेश्वर बंडगर याचा दुर्दैवी अंत झाल्याने गोणेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. गोणेवाडी येथील सुभाष तुकाराम गवळी यांची विवाहित मुलगी पुणे येथे राहते. रक्षाबंधनानिमित्त भावाला राखी बांधण्यासाठी ती पुण्याहून मंगळवेढ्याकडे निघाली होती. काल सायंकाळी सुमारे चार वाजता पुण्याहून खाजगी ट्रॅव्हलने निघाल्यानंतर रात्री दहा वाजता ती मंगळवेढ्यात पोहोचली.

बहिणीला मंगळवेढ्यातून घरी आणण्यासाठी तिचा भाऊ ऋतिक सुभाष गवळी आणि त्याचा मित्र महादेव परमेश्वर बंडगर हे दोघे दुचाकीवरून मंगळवेढ्याला गेले होते. MH 13 EV 9928 या दुचाकीवरून त्यांनी कशीस सुभाष गवळी हिला सोबत घेतले आणि तिघेही गोणेवाडीच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाले.

काही क्षणांतच आनंदाचे रूपांतर आक्रोशात
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला घरी आणण्याचा आनंद घेऊन सुरू झालेला हा प्रवास खुपसंगीपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर चौगुले वस्ती परिसरात काळरूप धारण करून आला. समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वॅगनआर चारचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी जबर होती की दुचाकीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. धडकेनंतर तिघेही रस्त्यावर वेगवेगळ्या दिशेने फेकले गेले. अपघातात महादेव परमेश्वर बंडगर याच्या कंबरेखाली गंभीर दुखापत झाली. त्याचा जागीच मृत्यू झाला. तर ऋतिक गवळी आणि कशीस गवळी हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी हलविले. ऋतिक गवळी याच्यावर मंगळवेढ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कशीस गवळी हिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी सांगली येथे हलविण्यात आले आहे.

मदतीसाठी पुढे सरसावला अन् स्वतःच काळाच्या पडद्याआड
महादेव परमेश्वर बंडगर हा स्वभावाने मनमिळाऊ आणि कष्टाळू तरुण म्हणून गावात परिचित होता. मित्राच्या बहिणीला रक्षाबंधनासाठी घरी आणण्यासाठी तो कोणताही संकोच न करता मित्रासोबत मंगळवेढ्याला गेला. मात्र, ज्याला सुरक्षितपणे घरी आणण्यासाठी तो निघाला होता, त्याच परतीच्या प्रवासात त्याच्यावर काळाने घाला घातला. मदतीसाठी मित्राच्या सोबत गेलेल्या महादेवचा अशा पद्धतीने दुर्दैवी मृत्यू झाल्याने बंडगर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
महादेव हा परमेश्वर दगडू बंडगर यांचा एकुलता एक मुलगा होता. घरचा एकुलता एक आधार अचानक हिरावल्याने बंडगर कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घराघरांत बहिण-भावाच्या नात्याचा आनंद साजरा होत असताना बंडगर कुटुंबावर मात्र शोककळा पसरली आहे. महादेवच्या अकाली निधनाची बातमी गावात पोहोचताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. मनमिळाऊ स्वभावाच्या या तरुणाच्या जाण्याने गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे. रक्षाबंधनाच्या आनंदासाठी सुरू झालेला हा प्रवास एका कुटुंबासाठी आयुष्यभराची वेदना देऊन गेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

दखल कार्याची …डॉ.भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व स्तरातून...

error: Content is protected !!