Homeराजकीयआ.अभिजीत पाटील-अनिल सावंत जवळीक वाढली,युती ठरू शकते ‘टर्निंग पॉईंट’! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार...

आ.अभिजीत पाटील-अनिल सावंत जवळीक वाढली,युती ठरू शकते ‘टर्निंग पॉईंट’! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष स्वबळावर लढणार पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक

पंढरपूर/ तालुका प्रतिनिधी
पंढरपूर शहरात आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, आमदार अभिजीत पाटील आणि भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल सावंत यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे. ही दोघांची जवळीक नगरपालिका निवडणुकीत निर्णायक ठरू शकते, अशी जोरदार चर्चा सध्या पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दोघांनाही मानणारा मोठा वर्ग….
पंढरपूर शहरात आमदार अभिजीत पाटील यांचा मजबूत गट कार्यरत आहे. दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अनिल सावंत यांनी लढत दिली असून, त्यानंतर शहरात त्यांना मानणारा आणि साथ देणारा एक मोठा वर्ग उभा राहिलेला आहे. या दोन्ही नेत्यांचा एकत्रित प्रभाव आगामी निवडणुकीत महत्त्वाचा ठरू शकतो.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष स्वबळावर लढणार…
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून नुकतीच विधानसभेचे निवडणूक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून लढवलेले अनिल सावंत या दोघांची जवळीक वाढलेली पाहता पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष स्वबळावर लढेल काय यावर पंढरपुरात सध्या चर्चा सुरू आहेत.

अनिलदादा भावी आमदार…
नुकताच पार पडलेल्या दहीहंडी कार्यक्रमात आमदार अभिजीत पाटील यांनी अनिल सावंत यांचा उल्लेख “भावी आमदार” असा करून एक महत्त्वपूर्ण संकेत दिला. त्याचबरोबर, पंढरपूर शहरातील गणेशोत्सव मंडळांचे स्वागत ‘अनिल सावंत मित्र मंडळा’च्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमालाही आमदार पाटील उपस्थित होते, यावरून दोघांमधील वाढते सख्य स्पष्टपणे दिसून आले.

युतीच्या चर्चेने राजकीय हालचाली…
या पार्श्वभूमीवर, पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी जर अभिजीत पाटील आणि अनिल सावंत यांची युती झाली, तर ती निवडणुकीचा ‘गेमचेंजर’ ठरू शकते, असे अनेक राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. सध्या दोघांची एकत्रित उपस्थिती आणि परस्परांना मिळणारा पाठिंबा पाहता, त्यांच्या युतीच्या शक्यतेने शहरातील इतर राजकीय गटांतही हालचाली वाढवल्या आहेत.

राजकीय समीकरणांचे बदलते चित्र….
पंढरपूर नगरपालिकेतील अनेक वॉर्डांमध्ये स्थानिक पातळीवर गटबाजी कायम असली तरी, वरच्या पातळीवरील अशा जुळणीमुळे निवडणुकीचे संपूर्ण चित्र बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत या दोघांच्या युतीची अधिकृत घोषणा होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंढरपूर शहरात आगामी नगरपालिका निवडणूक हे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक न राहता, राजकीय शक्तीप्रदर्शनाचे मैदान बनण्याची शक्यता आहे. अभिजीत पाटील – अनिल सावंत यांची एकजूट ही या निवडणुकीतील टर्निंग पॉईंट ठरू शकेल, हे आता स्पष्ट होत चालले आहे.

आक्रमक आणि संयमाचा रिझल्ट नेहमीच चांगला…
माढ्याचे आमदार अभिजीत पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील एक आक्रमक लोकप्रतिनिधी म्हणून परिचित आहेत. अगदी थोड्या कालावधीत प्रचार यंत्रणा राबवून ते माढा विधानसभा मतदारसंघात मातब्बर असलेले बबन दादा शिंदे यांना शह देत मोठा विजय त्यांनी मिळवला होता. याशिवाय त्यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात माढा विधानसभा मतदार संघाबरोबर पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील प्रश्न देखील मोठ्या अभ्यासपूर्ण पद्धतीने सभागृहात मांडले. त्यांना मानणारा मोठा वर्ग पंढरपूर शहरात आहे. आणि नुकतेच त्यांनी परिचारक कुटुंबावर तोंडसुख घेत आपला आक्रमकपणा दाखवून दिला आहे. या उलट राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत हे अत्यंत संयमी म्हणून ओळखले जातात. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात त्यांच्या सामाजिक कार्य खूप मोठे आहे. मंगळवेढा तालुक्यातील भैरवनाथ शुगर च्या माध्यमातून त्यांनी दोन्ही तालुक्यात अनेकांना मदत केली आहे. आणि जरी संयमी असली तरी तितकेच चाणाक्ष म्हणून ते ओळखले जातात. मंगळवेढा तालुक्यासह पंढरपूर तालुक्यात व शहरात त्यांनी चांगला जम बसवला आहे. त्यामुळे आक्रमकपणा आणि संयमीपणा जिथे एकत्रित येतो तिथे चांगला रिझल्ट आल्याचे आजवर पाहिले असल्याच्या चर्चा देखील सध्या होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

नराधमाला जन्मठेप..पत्नी व मुलीच्या खून प्रकरणी संजय कोरे यास जन्मठेपेची शिक्षा, मांजरांच्या पिलाच्या खुनासाठी...

नंदेश्वर / प्रतिनिधी : सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा) येथील पत्नी व अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी संजय नागप्पा कोरे यास पंढरपूर येथील अतिरिक्त...

error: Content is protected !!