Homeशिक्षण-प्रशिक्षणआदर्शवत उपक्रम...नंदेश्वर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेने मंगळवेढा तालुक्यात आदर्श निर्माण केला...

आदर्शवत उपक्रम…नंदेश्वर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेने मंगळवेढा तालुक्यात आदर्श निर्माण केला – गुरुलिंग दोलतडे

नंदेश्वर (प्रतिनिधी)
शालेय व्यवस्थापन समिती, शाळेतील शिक्षक आणि शिक्षण प्रेमी नागरिक या सर्वांचा लोकवर्गणीच्या माध्यमातून सहभाग नोंदवून प्रशालेतील जवळपास 170 विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद केंद्र शाळा नंदेश्वर यांच्या वतीने स्पोर्ट ड्रेस मोफत देण्यात आले. यासाठी शालेय व्यवस्थापन समितीने योग्य पुढाकार घेतला. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी जिल्हा परिषद केंद्र शाळा नंदेश्वर ही मंगळवेढा तालुक्यातील एकमेव प्रशाला असल्याने या प्रशालेने मंगळवेढा तालुक्यातील इतर शाळांसमोर एक आदर्श निर्माण केला असल्याची प्रतिक्रिया शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तथा माजी ग्रा.पं.सदस्य गुरुलिंग दोलतडे यांनी व्यक्त केली.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब सासणे, उपाध्यक्ष पोपट बंडगर, माजी अध्यक्ष दामाजी सलगर, ज्येष्ठ नागरिक श्रीरंग मोटे, मुख्याध्यापक प्रदीप पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सुनील कसबे, प्रताप परीट, जावेद मणेरी, भागवत बंडगर यांचेसह सहशिक्षक अशोक मासाळ, बाळासाहेब मासाळ, दादासाहेब इंगोले, पोपट हजारे, सचिन लाळे, गवळी हे उपस्थित होते.

गुणवत्तेला प्राधान्य देणारे शिक्षकवृंद..
यावेळी बोलताना दोलतडे म्हणाले की, जिल्हा परिषद केंद्र शाळा नंदेश्वर ही प्रशाला अशाप्रकारे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात नेहमी अग्रेसर राहिले आहे. याबरोबरच शाळेची गुणवत्ता राबविण्यात या प्रशालेचे शिक्षक अत्यंत दक्ष असल्याने शाळेची गुणवत्ता नेहमीच चांगल्या प्रतीची राहिली आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य समाधान मोटे यांचे आजोबा कै.संतराम मोटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोटे कुटुंबीयांच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप यावेळी करण्यात आले.

निस्वार्थ भावनेने योग्य नियोजन केल्यास काहीच अशक्य नाही – बाबासाहेब सासणे
विद्यार्थ्यांसाठी व तसेच शाळेसाठी आलेल्या निधीचे निस्वार्थ भावनेने आणि योग्य नियोजन केल्यास चांगल्या प्रकारचे उपक्रम राबविता येतात. यामध्ये शालेय व्यवस्थापन समिती, प्रशालेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि काही शिक्षणप्रेमी नागरिकांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट ड्रेसचे वाटप केले आहे. यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम राबविले जातील असे यावेळी बोलताना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब सासणे यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पंढरपूरच्या सांस्कृतिक वारशासोबत औद्योगिक विकासाचीही गरज; शिवसेना नेते अनिल सावंत यांची उद्योगमंत्री ना. उदय...

पंढरपूर / प्रतिनिधी : आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या पंढरपूर शहराला आता मराठी भाषा संवर्धनासोबतच औद्योगिक विकासाचीही जोड मिळावी, अशी मागणी पुढे येऊ...

यशाच्या शिखरावर असताना इतके टोकाचे पाऊल का उचलले?पोलिसांकडून रिलस्टार रोहिणी पाराधे यांच्या आत्महत्येची सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इंस्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून अल्पावधीतच...

फायटर स्पोर्ट्स क्लब नंदेश्वर यांच्या वतीने PSI रकमाजी पडवळे यांचा सत्कार संपन्न

नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या शिरणांदगी येथील रकमाजी जकु पडवळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक विभागीय...

मंगळवेढा तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सत्कार

नंदेश्वर / प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी मंगळवेढा भाजप युवा मोर्चाकडून उत्साहपूर्ण तयारी करण्यात आली. मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक सोमनाथ...

सलग दुसऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत सासणे याने मिळविले उत्तुंग यश, सर्व स्तरातून अभिनंदन व...

नंदेश्वर / प्रतिनिधी : एन.एम.एम.एस. या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग असे यश मिळवित शिष्यवृत्तीस पात्र ठरल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या उच्च...

error: Content is protected !!