Homeक्राईमआमदाराला बलात्कार प्रकरणी अटक,फिल्मी स्टाईल गोळीबार करत पोलीस ठाण्यातून फरार, स्वतःच्या पक्षावरच...

आमदाराला बलात्कार प्रकरणी अटक,फिल्मी स्टाईल गोळीबार करत पोलीस ठाण्यातून फरार, स्वतःच्या पक्षावरच केला आरोप

(टीम सोलापूर आजतक)
देशातील एका मोठ्या राजकीय पक्षाच्या आमदाराला बलात्कार आणि फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र कर्नाल येथील पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी पोलिसांवरच गोळीबार करत तिथून पळ काढल्याचे वृत्त “द इंडियन एक्सप्रेसने” दिले आहे. या प्रकरणात सदर दोषी आमदाराला स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. तिथे त्यांच्या काही सहकाऱ्यांनी गोळीबार केला. यात काही पोलीसही जखमी झाले आहेत. या गोंधळानंतर आम आदमी पक्षाचे आमदार हरमीत सिंग यांनी पांढऱ्या एसयुव्हीमधून पळ काढल्याचा आरोप केला जात आहे. पंजाबमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीबाबत आमदार हरमीत सिंग यांनी आम आदमी पक्षाची दिल्लीतील नेतृत्व आणि जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव कृष्ण कुमार यांच्यावर टीका केल्यानंतर हे सर्व घडले आहे.

आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांच्या पूर्व पत्नीने सोमवारी रात्री पटियाला येथील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १२ फेब्रुवारी २०१४ ते १२ जून २०२४ या कालखंडात आमदारांनी गुन्हा केल्याचा आरोप करण्यात आला. वा तक्रारीनंतर एफआयआर दाखल झाला असून आमदार हरमीत सिंग यांच्यावर बलात्कार, फसवणूक आणि गुन्हेगारी धमकीच्या आरोपाखाली भादंवि कलम ३७६, ४२० आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पठाणमाजरा यांनी आज सकाळी फेसबुकवर लाईव्ह येत आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. दिल्लीतील आपचे नेतृत्व पंजाबवर बेकायदेशीरपणे राज्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी याविरोधात आवाज उठवल्याबद्दल त्यांच्यावर आकसाने कारवाई होत आहे, असेही ते म्हणाले.

पठाणमाजरा यांच्या सहकाऱ्याने सांगितले की, त्यांना मंगळवारी सकाळी हरियाणातील कर्नाल येथील त्यांच्या नातेवाईकांच्या गावी अटक करण्यात आली. तर पोलिसांनी आरोप केला आहे की, रहिवाशांनी आमदारांना गोंधळाचा फायदा घेत ते एका एसयूव्ही अटक करू देण्यास विरोध केल्यानंतर गाडीतून पळून गेले. या गोंधळात गोळ्या झाडल्या गेल्या, ज्यामुळे पोलीसही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान पठाणमाजरा यांचे वकील सिमरनजीत सिंग सग्गु यांनी एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, हरमीत सिंग यांच्याविरुद एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने यासंबंधीचे प्रकरणं निकाली काढले होते मात्र दोन दिवसांपासून राज्यात चाललेल्या राजकीय घडामोडींच्चां पार्श्वभूमीवर सूड उगविण्यात येत आहे. तक्रारदाराने स्वतः कबूल केले होते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. मात्र की, ती हरमीत सिंग यांच्याबरोबर जाणुनबुजून बलात्काराचे कलम दाखल करण्यात आले आहे.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!