Homeराजकीयअनिल सावंत यांची जिल्हा परिषद निवडणुकीतून अनपेक्षित माघार; निर्णय कार्यकर्त्यांच्या जिव्हारी

अनिल सावंत यांची जिल्हा परिषद निवडणुकीतून अनपेक्षित माघार; निर्णय कार्यकर्त्यांच्या जिव्हारी

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरलेले भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून अखेर माघार घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या निर्णयामुळे अनेक कार्यकर्ते आक्रमक झाले असून, तालुक्यातील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भोसे जि. प. गटामधून निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह
मंगळवेढा तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढविण्यासाठी अनिल सावंत यांच्यावर कार्यकर्त्यांचा मोठा आग्रह होता. भैरवनाथ शुगर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात राबवलेली विकासकामे, शेतकरीहिताची भूमिका आणि संघटन कौशल्य यामुळे ते एक मजबूत उमेदवार मानले जात होते. मात्र, भोसे गटात महाविकास आघाडीतील उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापले होते.

हुलजंती जि.प. गटात अनिल सावंत यांनी निवडणूक लढवावी म्हणून कार्यकर्त्यांसह दिग्गज नेते आग्रही
दरम्यान, भोसे गटातील उमेदवारीचा तिढा सुटत नसल्याने अनिल सावंत यांना हुलजंती जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढविण्याची जोरदार मागणी पुढे आली. हुलजंती गटातील अनेक नेते, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना थेट भेटून निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला होता. विशेष म्हणजे भगीरथ भालके यांच्यासह हुलजंती गटातील अनेक दिग्गज नेते या मागणीसाठी ठाम होते.

अनिल सावंत यांचा निर्णय कार्यकर्त्यांच्या लागला जिव्हारी
सर्व परिस्थिती अनुकूल असतानाही अनिल सावंत यांनी “जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे” असे सांगत या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून, काही ठिकाणी उघडपणे संताप व्यक्त केला जात आहे. “नेतृत्वाची गरज असताना सावंत यांनी माघार घेणे योग्य नाही,” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. अनिल सावंत यांच्या माघारीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारी समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता असून, दोन्ही गटांतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी काळात कार्यकर्त्यांची नाराजी कशी शांत केली जाते आणि सावंत पुढील राजकीय भूमिका काय घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झुंज एकाकी..बसवराज पाटील यांनी दिलेली एकाकी झुंज भोसे गटासह मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात कायम स्मरणात...

नंदेश्वर / बाबासाहेब सासणे : मंगळवेढा तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भोसे गटातील लढत अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरली. या गटात भारतीय...

प्रदीप खांडेकर यांनी घेतले चिंचली मायाक्का देवीचे दर्शन; भोसे गटातील अनेक नेतेमंडळींची उपस्थिती

नंदेश्वर /प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित सदस्य प्रदीप खांडेकर यांनी चिंचली येथील मायाक्का देवीचे...

नंदेश्वरची सोनाली दोलतडे हिचे एमपीएससीमध्ये उज्ज्वल यश, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

नंदेश्वर / प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत नंदेश्वर गावची भूमिपुत्री सोनाली जगन्नाथ दोलतडे हिने घवघवीत यश संपादन केले आहे....

प्रदीप खांडेकर यांच्या विजयात ‘ नंदेश्वर पॅटर्न ‘ ठरला निर्णायक

नंदेश्वर/ प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक लक्षवेधक आणि हायव्होल्टेज ठरलेल्या भोसे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत अखेर भाजपचे उमेदवार प्रदीप खांडेकर यांनी मोठे मताधिक्य मिळवित...

भोसे गटात कोण बाजी मारणार ? दोन्ही गटाकडून विजयाची दावे, जातीय समीकरणे ठरणार निर्णायक,...

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधक ठरलेल्या भोसे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या गटात यंदा तिरंगी...

error: Content is protected !!