Homeराजकीयअनिल सावंत यांची जिल्हा परिषद निवडणुकीतून अनपेक्षित माघार; निर्णय कार्यकर्त्यांच्या जिव्हारी

अनिल सावंत यांची जिल्हा परिषद निवडणुकीतून अनपेक्षित माघार; निर्णय कार्यकर्त्यांच्या जिव्हारी

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरलेले भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून अखेर माघार घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या निर्णयामुळे अनेक कार्यकर्ते आक्रमक झाले असून, तालुक्यातील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवेढा तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढविण्यासाठी अनिल सावंत यांच्यावर कार्यकर्त्यांचा मोठा आग्रह होता. भैरवनाथ शुगर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात राबवलेली विकासकामे, शेतकरीहिताची भूमिका आणि संघटन कौशल्य यामुळे ते एक मजबूत उमेदवार मानले जात होते. मात्र, भोसे गटात महाविकास आघाडीतील उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापले होते.

दरम्यान, भोसे गटातील उमेदवारीचा तिढा सुटत नसल्याने अनिल सावंत यांना हुलजंती जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढविण्याची जोरदार मागणी पुढे आली. हुलजंती गटातील अनेक नेते, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना थेट भेटून निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला होता. विशेष म्हणजे भगीरथ भालके यांच्यासह हुलजंती गटातील अनेक दिग्गज नेते या मागणीसाठी ठाम होते.

सर्व परिस्थिती अनुकूल असतानाही अनिल सावंत यांनी “जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे” असे सांगत या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून, काही ठिकाणी उघडपणे संताप व्यक्त केला जात आहे. “नेतृत्वाची गरज असताना सावंत यांनी माघार घेणे योग्य नाही,” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.

अनिल सावंत यांच्या माघारीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारी समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता असून, दोन्ही गटांतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी काळात कार्यकर्त्यांची नाराजी कशी शांत केली जाते आणि सावंत पुढील राजकीय भूमिका काय घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स. बाळकृष्ण महाराज यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मोत्सव, देवसागर साधक...

नंदेश्वर / प्रतिनिधी : ब्रह्मांडनायक रा.रा. श्री. स.स. बाळकृष्ण महाराज (नंदेश्वर) आणि श्री. स.स. भाऊसाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र नंदेश्वर येथे श्री. स.स....

सचिन निकम यांना ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, सर्व स्थरातून अभिनंदन

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी माध्यमिक आश्रमशाळा हुन्नुरचे सहशिक्षक सचिन निकम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ यासाठी निवड...

श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक प्रवीण डांगे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्री कार्याची दखल घेत त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक...

दखल कार्याची… डॉ. भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने वैद्यकीय सेवा देत समाजातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा आधार देणारे नंदेश्वरचे सुपुत्र डॉ.भारत गरंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय...

दखल कार्याची …डॉ.भारत गरंडे यांना ‘शिव मल्हार वैद्यकीय समाजभूषण जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान, सर्व स्तरातून...

error: Content is protected !!