Homeसामाजिकभाळवणी येथील सौर ऊर्जा कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर महिला...

भाळवणी येथील सौर ऊर्जा कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर महिला शेतकऱ्यांचे उपोषण, शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केल्याचा आरोप

मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी

भाळवणी (ता. मंगळवेढा) येथील शेतकरी महिला तायडा महादेव चौगुले विद्या गोरख गेजगे तसेच शेतकरी महादेव जबरदस्त चौगुले यांनी शेजारील प्रोजल सौर ऊर्जा कंपनीमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक व शेतीचे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. कंपनीने बेकायदेशीररीत्या काम करत त्यांच्या शेतीवर अतिक्रमण, पिकांचे नुकसान व नैसर्गिक जलप्रवाहात बदल केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. या कंपनीवर कारवाई करून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मंगळवेढा येथील प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने काम सुरू करताना सरकारी सर्वे मोजणी न करता जमीन सपाटीकरण केले. यावेळी संबंधित क्षेत्र आपले असल्याचे वारंवार सांगूनही कंपनीने अंदाजे दोन एकर शेतीतील बांध, झाडे व झुडपे नष्ट करून त्या जमिनीवर रोटावेटर फिरवला. नंतर सरकारी मोजणी झाल्यावर सदर क्षेत्र हे महादेव चौगुले यांचेच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कंपनीने कंपाउंड टाकले असले तरी आधी नष्ट केलेल्या शेतीबाबत योग्य तो न्याय दिला नसल्याचा आरोप आहे.

तसेच कंपनीने कंपाउंड भिंत अवघ्या अर्धा ते एक फूट अंतरावर उभारल्याने त्याची सावली शेतातील पिकांवर पडून उत्पादनात घट होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सुमारे ३८५० फूट लांबीचा हा कंपाउंड शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे.
कंपनीने सपाटीकरण करताना जलशिवार योजनेअंतर्गत झालेली कामे, बांध, नाले तसेच मोठी झाडे नष्ट केली. नैसर्गिक जलप्रवाह बदलून सर्व पाणी शेतकऱ्यांच्या शेतात सोडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महादेव चौगुले यांच्या चार एकर क्षेत्रातील मका पिकाचे पाण्यामुळे नुकसान झाले असून त्यासाठी त्यांनी सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा खर्च केल्याचे सांगितले आहे. सुरुवातीला कंपनीने नुकसानभरपाई देण्याचे कबूल केले होते, मात्र आता नकार दिला जात असल्याचा आरोप आहे.
शेजारील शेतकरी विद्या गेजगे यांच्या शेतातही कंपनीकडून आलेल्या पाण्यामुळे पिके पूर्णपणे पाण्यात गेली असून आजतागायत वापसा न आल्याने खरीप व रब्बी हंगामातील पिके घेता आलेली नाहीत.

या प्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून कंपनीकडे पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने, संबंधित सौर ऊर्जा कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली तसेच दिनांक २२ पासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पण प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही झाली नसल्यामुळे शेतकरी महादेव चौगुले व महिला शेतकरी तायडा महादेव चौगुले विद्या गोरख गेजगे यांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास कंपनी जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

भाळवणी ता.मंगळवेढा येथील प्रोजल या सौरऊर्जा कंपनीमुळे आमचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय आमच्या शेतीचे झालेले नुकसान पाहून आम्हाला मानसिक ताणतणाव देखील खूप मोठा झाला आहे. ही सर्व परिस्थिती डोळ्यांनी पाहत घरी बसण्यापेक्षा आम्ही प्रांत कार्यालयासमोर आमचा प्राण त्यागू. पण आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही.

शेतकरी महिला तायडा चौगुले, विद्या गेजगे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!