Homeराजकीयभगीरथ भालके, अनिल सावंत, सिद्धेश्वर आवताडे यांच्या कार्यालयात, मंगळवेढ्यात भाजपविरोधात समविचारी आघाडीचा...

भगीरथ भालके, अनिल सावंत, सिद्धेश्वर आवताडे यांच्या कार्यालयात, मंगळवेढ्यात भाजपविरोधात समविचारी आघाडीचा नवा प्रयोग???

मंगळवेढा (प्रतिनिधी)
मंगळवेढा तालुक्यात भाजपचा मजबूत गड म्हणून ओळख असतानाच आता पुन्हा एकदा भाजपला रोखण्यासाठी समविचारी आघाडीचा नवा प्रयोग सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. मंगळवेढा येथील खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांच्या संपर्क कार्यालयात भाजपच्या विरोधात प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येऊन भाजपविरोधात एकत्रित लढ्याची भूमिका घ्यावी, असा सूर उमटला असल्याची माहिती मिळत आहे.

मान्यवरांची मांदियाळी..
या बैठकीला माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत,जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव अवताडे,ज्येष्ठ नेते रामभाऊ वाकडे, मुरलीधर दत्तू, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुशील आवताडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग चौगुले, सोमनाथ माळी, काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल घुले आणि शिवसेना (शिंदे गट) शहराध्यक्ष प्रतिक किल्लेदार यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, युवक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भगीरथ भालके, अनिल सावंत, बबनराव आवताडे, प्रशांत साळे एकत्रित आल्याने मंगळवेढा तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चा…
या बैठकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंगळवेढा तालुक्यात समविचारी आघाडी पुन्हा सक्रिय होत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्या बैठकीत महत्त्वाचे नेते अनुपस्थित होते. मात्र यावेळी भगीरथ भालके, अनिल सावंत, बबनराव अवताडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांची उपस्थिती आणि एकत्र येणं राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. विशेष म्हणजे, भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांनी याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात एकमेकांविरोधात लढले होते. याचा भाजपला फायदा झाला होता. आता मात्र हे दोन्ही नेते एकत्र आल्याने, तसेच बबनराव आवताडे आणि इतर पक्षांच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाल्याने ही समविचारी आघाडी भाजपला जोरदार टक्कर देईल, अशी चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. राजकीय समीकरणांमध्ये होत असलेल्या या हालचालींमुळे मंगळवेढ्यातील आगामी निवडणुका रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एकजुटीचा सोलापूर पॅटर्न….लोहार समाजाच्या एकीची मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्यानेच रोवली, राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना...

लोहार युथ फाऊंडेशनतर्फे १६ ऑगस्टला विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा, मान्यवरांची लाभणार उपस्थिती

अहिल्यानगर / प्रतिनिधी : लोहार युथ फाऊंडेशन-अहिल्यानगर व समस्त लोहार समाज, अहिल्यानगर यांच्या वतीने विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले...

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा व शिक्षकांचा सन्मान राखून ध्येयाने शिक्षण घ्यावे, नंदेश्वर येथे दंगलकार नितीन चंदनशिवे...

नंदेश्वर (प्रतिनिधी): आई-वडील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मुलांना शिक्षण देतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या, त्यांच्या स्वप्नांचा आदर करा आणि त्यांची मान उंचावेल...

नंदेश्वर येथे सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान, स्व.दादासाहेब येसू मेटकरी व स्व.समाबाई...

नंदेश्वर (प्रतिनिधी): स्व. दादासाहेब येसू मेटकरी व स्व. समाबाई दादासाहेब मेटकरी यांच्या संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते तथा दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रेरणादायी...

स्तुत्य उपक्रम…रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले कौतुक,शाळा व गावाच्या विकासासाठी...

मंगळवेढा | प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात...

error: Content is protected !!