Homeराजकीयबसवराज पाटील यांच्या होम ग्राउंडवर प्रदीप खांडेकर यांच्या प्रचारसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोसे...

बसवराज पाटील यांच्या होम ग्राउंडवर प्रदीप खांडेकर यांच्या प्रचारसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोसे गटात राजकीय चर्चा रंगली

मारोळी (प्रतिनिधी) : भोसे जिल्हा परिषद गटासाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रदीप खांडेकर यांच्या प्रचाराला वेग आला असून, मारोळी गावात झालेल्या प्रचारसभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात खांडेकर यांचे स्वागत केले.

या प्रचारसभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण खांडेकर यांच्याविरोधात निवडणूक लढवत असलेले तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार बसवराज पाटील हे मारोळी गावचे भूमिपुत्र आहेत. त्यामुळे पाटील यांचे ‘होम ग्राउंड’ मानल्या जाणाऱ्या मारोळी गावात भाजपच्या सभेला मिळालेल्या प्रतिसादाने भोसे जिल्हा परिषद गटात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. प्रचारसभेत बोलताना प्रदीप खांडेकर यांनी जिल्हा परिषद स्तरावर विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी विकास, पारदर्शकता आणि लोकसेवा हाच आपला अजेंडा असल्याचे सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभास्थळी नागरिकांनी आपल्या समस्या आणि अपेक्षा मांडल्या असता, त्या सोडवण्यासाठी सातत्याने आ. समाधान आवताडे यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन खांडेकर यांनी दिले. मारोळी गावात मिळालेल्या या प्रतिसादामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या सभेने गटातील समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!