Homeराजकीयभोसे जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी; भोसे गटात भाजपचा उमेदवार निश्चित, विरोधकांत अद्याप...

भोसे जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी; भोसे गटात भाजपचा उमेदवार निश्चित, विरोधकांत अद्याप एकमत नाही

भोसे / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधक ठरलेल्या भोसे जिल्हा परिषद गटातून भाजपने माजी पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित केल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपने या गटात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रदीप खांडेकर यांच्या भेटीगाठी
भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी भोसे गटातून प्रदीप खांडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची जोरदार चर्चा असून, यानंतर खांडेकर यांनी मतदारसंघात भेटीगाठी, संपर्क दौरे सुरू केले आहेत. यामुळे आमदार आवताडे आणि खांडेकर यांनी निवडणुकीसाठी रणनिती आखत आघाडी घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. विशेष म्हणजे भोसे गटासह इतर तीन जिल्हा परिषद गटांचे उमेदवारही आमदार आवताडे यांनी अंतिम केल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

विरोधी गोटात एकमत होईना
दुसरीकडे भाजपविरोधी महाविकास आघाडी किंवा समविचारी आघाडी यांच्याकडून अद्याप ठोस उमेदवार निश्चित झालेला नसल्याचे दिसत आहे. चर्चेच्या एक-दोन फेऱ्या झाल्या असल्या तरी एकमत न झाल्याने विरोधी गोटात संभ्रमाचे वातावरण आहे. भोसे जिल्हा परिषद गटातून भाजपविरोधी आघाडीकडून भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, श्री संत दामाजी कारखान्याचे संचालक बसवराज पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश सचिव अ‍ॅड. रविकिरण कोळेकर हे तिघे इच्छुक असल्याची माहिती आहे. याशिवाय नंदेश्वर येथील श्री बागडेबाबा दूध संस्थेचे चेअरमन दादासाहेब दोलतडे हे देखील भोसे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. मात्र, ते कोणत्या पक्ष अथवा आघाडीकडून निवडणूक लढवणार याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. मात्र निवडणूक लढविणार हे निश्चित असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांनीही भोसे जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यांच्या भूमिकेकडेही सध्या लक्ष लागून राहिले आहे.

आजच्या बैठकीकडे लक्ष
सत्ताधारी भाजपने उमेदवारी जाहीर करून निवडणुकीत आघाडी घेतली असताना, विरोधी आघाडी मात्र अजूनही चर्चेच्या फेऱ्यांत अडकलेली दिसत आहे. दरम्यान, आज शनिवार, दिनांक १७ रोजी समविचारी आघाडी किंवा महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या बैठकीत भोसे जिल्हा परिषद गटासह इतर गटांबाबत निर्णय होणार का, की चर्चेचाच सिलसिला पुढे चालू राहणार, याकडे संपूर्ण मंगळवेढा तालुक्याचे लक्ष लागले आहे. एकूणच भोसे जिल्हा परिषद गटातील लढत रंगतदार ठरण्याची चिन्हे असून, आगामी काही दिवसांत राजकीय समीकरणे वेगाने बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!