Homeराजकीयभोसे जिल्हा परिषद गटात प्रदीप खांडेकर यांची ताकद वाढली; नाथपंथी डवरी समाजाचा...

भोसे जिल्हा परिषद गटात प्रदीप खांडेकर यांची ताकद वाढली; नाथपंथी डवरी समाजाचा जाहीर पाठिंबा

भोसे / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गटात भाजप उमेदवार प्रदीप खांडेकर यांची राजकीय ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भाजपच्या वतीने सुरू असलेल्या जोरदार प्रचाराला आता नाथपंथी डवरी समाजाचा जाहीर पाठिंबा मिळाल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात खांडेकर यांची स्थिती अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.

नाथपंथी डवरी समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व समाजबांधवांनी एकत्र येत प्रदीप खांडेकर यांना पाठिंबा जाहीर केला. या वेळी समाजातील ज्येष्ठ, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा आणि सामाजिक न्यायासाठी प्रदीप खांडेकर यांचे काम व भूमिका विश्वासार्ह असल्याने हा पाठिंबा देण्यात आल्याचे समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
भाजपच्या माध्यमातून भोसे जिल्हा परिषद गटात विकासाचे नवे पर्व सुरू करण्याचा निर्धार प्रदीप खांडेकर यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. त्यांच्या या विकासाभिमुख भूमिकेमुळे विविध समाजघटकांचा त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.

नाथपंथी डवरी समाजाच्या पाठिंब्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून प्रचाराला अधिक गती मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. घराघरांत जाऊन संपर्क साधणे, बैठका, प्रचारफेऱ्या यामधून भाजपचा प्रचार अधिक प्रभावीपणे सुरू आहे. भोसे जिल्हा परिषद गटातील निवडणूक आता चुरशीची होत असताना, नाथपंथी डवरी समाजाचा जाहीर पाठिंबा हा प्रदीप खांडेकर यांच्यासाठी महत्त्वाची बाब ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकीत हा पाठिंबा किती निर्णायक ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!