Homeराजकीयभोसे जिल्हा परिषद गटात भाजपविरोधी आघाडीत तीन गट, भाजपाला फायदा होण्याची शक्यता

भोसे जिल्हा परिषद गटात भाजपविरोधी आघाडीत तीन गट, भाजपाला फायदा होण्याची शक्यता

भोसे / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारा भोसे जिल्हा परिषद गट सध्या मोठ्या राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू ठरत आहे. या गटात भाजपविरोधी आघाडीमध्ये एकी होण्याऐवजी चक्क तीन वेगवेगळे गट तयार झाल्याने भारतीय जनता पार्टीसाठी वातावरण अनुकूल होत असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

मंगळवेढा तालुक्यात आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात विरोधी आघाडीत समन्वयाअभावी मतभेद उफाळून आले असून, इच्छुक उमेदवार, नेतृत्वाचा प्रश्न आणि स्थानिक राजकारणातील जुने वाद यामुळे आघाडीमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

विरोधकांमध्ये एकीऐवजी गटबाजी
सध्याच्या परिस्थितीत भाजपविरोधी आघाडी दोन गटांत विभागली जाईल, अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात तीन स्वतंत्र गट सक्रिय झाल्याने मतविभागणी अटळ असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. यामुळे भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट फायदा भारतीय जनता पार्टीला होण्याची शक्यता बळावली आहे.

भाजपला ताकद देणारी उमेदवारी
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून माजी सभापती प्रदीप खांडेकर यांची उमेदवारी निश्चित झाल्याने भाजपच्या पारड्यात आणखी वजन वाढले आहे. खांडेकर यांचा प्रशासकीय अनुभव, भोसे परिसरातील चांगला जनसंपर्क आणि विकासकामांची ओळख ही भाजपसाठी जमेची बाजू मानली जात आहे. स्थानिक पातळीवर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विरोधकांची फूट आणि मजबूत उमेदवार हे समीकरण भाजपसाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी,शिवसेना शिंदे गट, बबनराव आवताडे गट, माजी पालकमंत्री ढोबळे गट यांच्या आघाडी कडून राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने दादासाहेब दोलतडे, तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून बसवराज पाटील, काँग्रेसच्या वतीने रविकिरण कोळेकर हे उमेदवार भोसे जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहेत. वास्तविक परिस्थिती पाहता या तिन्ही उमेदवारांमधून एक उमेदवार समोर येणे अपेक्षित होते. पण तसे न घडता तीन उमेदवार भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात लढत असल्यामुळे भाजपच्या उमेदवाराला फायदा होईल अशा चर्चा आहेत.

राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
भोसे जिल्हा परिषद गटातील निवडणूक ही केवळ एका जागेपुरती मर्यादित नसून, तिचा परिणाम संपूर्ण मंगळवेढा तालुक्यातील राजकारणावर होऊ शकतो. त्यामुळे येत्या काळात विरोधी आघाडी एकत्र येण्यासाठी हालचाली वाढवते की गटबाजी कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, सध्याच्या परिस्थितीत भाजपसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून, विरोधकांनी वेळेत एकी साधली नाही तर भोसे जिल्हा परिषद गटावर भाजपचा झेंडा फडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगतची धोकादायक विहीर बुजविण्यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने बोलाविली विशेष ग्रामसभा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न...

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगत आणि नंदेश्वर गावाच्या हद्दीत असलेली धोकादायक विहीर तातडीने बुजविण्याच्या मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने विशेष...

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसाय समाविष्ट करा, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप...

नंदेश्वर | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर धोरणात मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसायाचा समावेश करावा, अशी मागणी...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नंदेश्वर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्रलंबित प्रश्नांचे काय???

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध राजकीय गट व नेतेमंडळींनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

error: Content is protected !!