Homeराजकीयभोसे जिल्हा परिषद गटातील युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देणार, राष्ट्रवादी शरदचंद्र...

भोसे जिल्हा परिषद गटातील युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देणार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सिद्धेश्वर रणे यांचे प्रतिपादन

भोसे / विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गटातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा ठाम निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार सिद्धेश्वर रणे यांनी व्यक्त केला आहे. युवकांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करत, येत्या काळात मार्गदर्शन शिबिरे, प्रशिक्षण उपक्रम तसेच विविध क्षेत्रांशी समन्वय साधून रोजगार उपलब्ध करून देण्याचे सांगितले आहे.

रोजगार संधीसाठी मार्गदर्शन शिबिरे व विशेष शिबिरे आयोजित करणार
सिद्धेश्वर रणे यांनी सांगितले की, आज शिक्षण असूनही अनेक युवक नोकरीपासून वंचित आहेत. ही बाब लक्षात घेऊन युवकांना स्पर्धा परीक्षा, खासगी कंपन्या, आयटी क्षेत्र तसेच विविध स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन देण्यासाठी विशेष शिबिरे राबविण्यात येतील. युवकांमध्ये कौशल्य विकास, आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही सिद्धेश्वर रणे यांनी अनेक युवकांना नोकरी मिळवून देण्याच्या बाबतीत प्रत्यक्ष मदत केली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक युवकांना कंपन्या आणि विविध खाजगी संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

युवकांना रोजगार मिळाला तरच खरा विकास
“राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी असते. युवकांना रोजगार मिळाला तरच गावाचा आणि तालुक्याचा खरा विकास होईल,” असे मत सिद्धेश्वर रणे यांनी व्यक्त केले. त्यांच्या या भूमिकेला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेक युवक स्वयंस्फूर्तीने त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. भोसे जिल्हा परिषद गटात विकासाभिमुख, युवककेंद्री आणि रोजगाराभिमुख नेतृत्वाची गरज असून, सिद्धेश्वर रणे हे त्या अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. आगामी काळात त्यांच्या माध्यमातून युवकांसाठी ठोस आणि दीर्घकालीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगतची धोकादायक विहीर बुजविण्यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने बोलाविली विशेष ग्रामसभा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न...

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर-जुनोनी रस्त्यालगत आणि नंदेश्वर गावाच्या हद्दीत असलेली धोकादायक विहीर तातडीने बुजविण्याच्या मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यासाठी नंदेश्वर ग्रामपंचायतीने विशेष...

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसाय समाविष्ट करा, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप...

नंदेश्वर | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर धोरणात मंगळवेढा तालुक्याचा दुग्धव्यवसायाचा समावेश करावा, अशी मागणी...

नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नंदेश्वर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रासह प्रलंबित प्रश्नांचे काय???

नंदेश्वर | प्रतिनिधी : नंदेश्वर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून विविध राजकीय गट व नेतेमंडळींनी आपापल्या पातळीवर पूर्वतयारी...

मंगळवेढा तालुक्यातील “ही” शाळा सुरू असते बारा महिने, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांची...

नंदेश्वर | प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा बंडगरवाडी, नंदेश्वर या प्रशालेने बारा महिने नियमितपणे शाळा सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला असून, ग्रामीण भागातील...

मेल्यावर मदत करून काय उपयोग…मदत देण्याऐवजी त्याच निधीतून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक विहिरींवर सुरक्षा...

नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४०...

error: Content is protected !!