Homeराजकीयभोसे जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला साथ द्या, आ. समाधान आवताडे...

भोसे जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला साथ द्या, आ. समाधान आवताडे यांचे मतदारांना आवाहन

भोसे / विशेष प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाला भक्कम पाठबळ द्यावे, असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले. भोसे जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार प्रदीप खांडेकर, भोसे पंचायत समिती गणाचे उमेदवार आप्पासो निकम तसेच रड्डे पंचायत समिती गणाचे उमेदवार दत्तात्रय कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभांमध्ये ते बोलत होते. या प्रचार दौऱ्याची सुरुवात मानेवाडी येथून झाली. त्यानंतर रेवेवाडी, लोणार, पडोळकरवाडी येथे तर महमदाबाद (हू.) येथे प्रचार सभा पार पडली. प्रत्येक ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी भोसे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रदीप खांडेकर, भोसे पंचायत समिती गणाचे उमेदवार आप्पासो निकम, रड्डे पंचायत समिती गणाची उमेदवार दत्ता कांबळे, दामाजी कारखान्याचे संचालक तानाजी काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, अंबादास कुलकर्णी, शिवसेना माजी तालुकाप्रमुख अशोक चौंडे, नंदेश्वर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे यांचेसह अनेक गावचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की, भाजप सरकारने केंद्र व राज्य पातळीवर ग्रामीण भागासाठी राबवलेल्या विविध विकास योजनांचा थेट लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचवला आहे. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, शेतीपूरक सुविधा आणि रोजगार निर्मिती या सर्व क्षेत्रांत ठोस काम झाले आहे. ही विकासाची घडी पुढे नेण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजपचे सक्षम व कार्यक्षम प्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले की, प्रदीप खांडेकर, आप्पासो निकम आणि दत्तात्रय कांबळे हे तळागाळातील जनतेशी थेट संपर्क असलेले, कामाचा अनुभव असलेले उमेदवार असून ते निवडून आल्यास भोसे व परिसरातील विकासकामांना गती मिळेल. प्रत्येक गावाच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार केला जाईल.

या प्रचार दौऱ्यादरम्यान भाजप व मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नेते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठिकठिकाणी फुलांच्या हारांनी व घोषणांनी उमेदवारांचे व आमदारांचे स्वागत करण्यात आले. सभांमधून विकासाच्या मुद्द्यांवर सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून भाजपच्या उमेदवारांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेच्या अस्तित्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह, पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह दुग्ध व्यवसाय...

0
नंदेश्वर / बाबासाहेब सासणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः मंगळवेढा तालुक्याच्या...

भैरवनाथाची साखर कारखानदारीनंतर आता दुग्ध व्यवसायात एन्ट्री,भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत...

0
मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत आता दुग्ध व्यवसाय...

मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; तातडीने उपाययोजना व मदत द्या, बहुजन गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष...

मंगळवेढा / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी...

धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तहसीलदारांना निवेदन, आश्वासनाची पूर्तता करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी;...

मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच या प्रश्नावर शासनाने ठोस व निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सकल...

कै. सौ. इंदुबाई (नानी) दोलतडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ. इंदुबाई (नानी) भिवा दोलतडे...

error: Content is protected !!